महाराष्ट्र सामाजिक

बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर !
यवतमाळ,(२७ ऑक्टोबर) –
बांगलादेशात यावर्षी नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरांवर आक्रमण करणाऱ्या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने २६ ऑक्टोबर या दिवशी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे यांच्यामार्फत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री भारत सरकार यांना निवेदन पाठवण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश हा मुसलमान बहुल तथा इस्लामी देश असल्यामुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंची संपत्ती, जागा आणि महिलांची अक्षरश: लूट केली जात आहे. हिंदूं मंदिरांची तोडफोड, देवतांच्या मूर्तींचे भंजन या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. एकप्रकारे बांगलादेश हिंदूंसाठी नरक बनला आहे. तेथील सरकार ‘हिंदूंचे रक्षण करू’ असे सांगत असले, तरी तेथील धर्मांधांना ते रोखू शकत नाहीत. तसेच अप्रत्यक्षपणे सरकारचीच धर्मांधांना फूस आहे कि काय, अशी शंका येते. तरी या अनुषंगाने आम्ही मागणी करत आहोत की १. जगभरात भारत हा एकमेव हिंदूंचा देश आहे. या नात्याने जगभरातील हिंदु समाजाची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. या दृष्टीने बांगलादेशमधील हिंदू समाजाला सुरक्षा पुरवावी, यासाठी भारत सरकारने तात्काळ बांगलादेशच्या पंतप्रधानांशी थेट संवाद साधावा.
2. हिंदूंवर हिंसक आक्रमणे करनाऱ्या, मूर्तींचे भंजन करणाऱ्या, दुर्गापूजा मंडप उद्ध्वस्त करणाऱ्या धर्मांधांना शोधून काढावे, त्यांच्यावर आणि त्यांच्या सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
3. भारत सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांबाबत ‘संयुक्त राष्ट्रा’त मुद्दा उपस्थित करून या देशांवर दबाव निर्माण करावा.
४. हिंदूंना सुरक्षा पुरवली नाही किंवा असेच चालू राहिले तर, बांगलादेशाशी सर्व प्रकारचे संबंध संपुष्टात येतील, तसेच त्यांच्यावर निर्बंध लादण्यात येतील, अशी ताकीद बांगलादेशच्या सरकारला द्यावी.
निवेदन देतांना इस्कॉन संप्रदायाचे अभिरामजी दास, पुजारी ब्रजेन्‍द्र नंदन दास, श्रीरामनवमी उत्सव समितीचे सदस्य मनोज औदार्य, युवासेवा संघाचे गणेश साठे, हिंदुत्वनिष्ठ मंगेश साखरकर, सनातन संस्थेचे श्री. पांडुरंग पिल्लेवार आणि हिंदु जनजागृती समितीचे दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.

Copyright ©