यवतमाळ सामाजिक

ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत वगारा (टाकळी) येथे हरभरा बियाण्याच्या परमिट चे वाटप

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत वगारा (टाकळी) येथे हरभरा बियाण्याच्या परमिट चे वाटप
———————————————
ईश्वर चिठ्ठी व्दारे ४० लाभार्थ्यांची निवड
———————————————
घाटंजी- कृषी विभाग भारत, महाराष्ट्र शासन तथा महाबीज अकोला मार्फत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम रब्बी-२०२१ अंतर्गत अनुदानावर मिळणाऱ्या बियाण्याचे परवाना घाटंजी कृषी अधिकारी कार्यालयामार्फत वगारा (टाकळी) येथे वाटप करण्यात आले.
खरिप हंगामातील सोयाबीन पिकाचे नुकतीच काढणी झाली या रिक्त जागेवर दुसरे पिक म्हणून हरभरा पिक लावण्यात येणाऱ्या शेतकऱ्यासाठी अनुदान तत्वावर दिल्या जाणाऱ्या बियाण्यांसाठी उद्दिष्टपेक्षा जास्त शेतकरी असल्याचे पाहून वगारा टाकळी येथे कार्यरत कृषी सहाय्यक जरांडे यांनी समयसूचकता बाळगून गावातील शेतकरी व स्थानिक पदाधिकारी यांना बोलावून ईश्वर चिठ्ठीव्दारे ४० लाभार्थ्यांची निवड करून सर्व प्रथम त्रिवेन किसन बोरुले या शेतकऱ्याला घाटंजी तालुका पत्रकार संघाचे सचिव राजु चव्हाण यांच्या हस्ते परमिट देण्यात आले. त्यानंतर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिनेश गाऊत्रे आणि वगारा (टाकळी) येथिल उपसरपंच आतीक शेख यांचे हस्ते अनुक्रमे परमिट वाटप करण्यात आले. यात जॉकी ९२१८ हे बियाणे ३० किलो२४०० रुपये किमतीचे बियाणे७५० रुपये अनुदान देत१६५० रुपयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात अनुदान मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करून बियाणे परवाना घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत परमिट ची उचल केली. या वेळी गावातील उपसरपंच अतिक शेख, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश वल्लपवार, ग्राम पंचायत सदस्य सुभाष मुद्देलवार, अरविंद पलिकोंडवार, सतिष म्याकलवार, भालचंद्र पलिकोंडवार, अतिश वल्लपवार, शंकर लोनबेल, शेख खलिद, सुमित म्याकलवार, निखिल वल्लपवार, शेख अतावल, प्रशांत चौधरी यांचे सह शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक जरांडे यांनी बियाण्याच्या अनुदानासह सर्व प्रक्रिया उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

Copyright ©