यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथे कायदे विषयक शिबीर तथा सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासह शिबिर संपन्न..!

सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ खान

सावळी सदोबा येथे कायदे  विषयक शिबीर तथा सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासह शिबिर संपन्न..!

पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळी सदोबा येथील साई मंगल कार्यालयामध्ये कायदे विषयक शिबीर आयोजन करण्यात आले होते.
यासोबतच ग्रामीण जनतेच्या सावळी सर्कलमधील प्राथमिक स्वरूपाच्या समस्या सोडवण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने मार्गदर्शन शिबिर तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण जनजागृती करण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने सामुहीक कॕम्प आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला आर्णी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. एच. शाहिद उपस्थित होते.
विधी सेवा समितीचे सदस्य चौधरी साहेब यांनी संचालन केले. चव्हाण साहेब व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच तहसीलदार परशराम भोसले यांनी महसूल विभागाच्या विविध योजना मध्ये असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी लोकांना मार्गदर्शन केले. सोबतच महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. या वेळी पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) गोविंद इंगोले, नायब तहसीलदार तुंडलवार, नायब तहसीलदार कडसने, पुरवठा अधिकारी राठोड, डेबरे बाबु, सावळी सदोबा भागातील तलाठी चौधरी, जाधव,रूपाली नेवारे व या भागातील ग्रामसेवक कैलास आडे, अमोल जगताप, राजपाल गुजर तथा सावळी सदोबाच्या सरपंचा अंजनाताई गेडाम , महिला बचत गटाच्या अध्यक्षा व पदाधिकारी, परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये आर्णी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी गोविंद इंगोले यांनी भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे सामूहिक वाचन व शपथ घेण्यात आली. सदरच्या शासकीय कार्यक्रमाकरिता विनामूल्य साई मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी या भागातील नागरिकांच्या समस्या वेळेवर सुटल्यामुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण होते.

Copyright ©