यवतमाळ सामाजिक

मतदार नोंदणीसंदर्भात नोव्हेंबरमध्ये विशेष मोहीम

मतदार नोंदणीसंदर्भात नोव्हेंबरमध्ये विशेष मोहीम

जिल्हा युवा पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

चालक परवानासाठी ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र
_____________________________
मतदार नोंदणीसंदर्भात नोव्हेंबरमध्ये विशेष मोहीम

यवतमाळ दि.27 ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दि.01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आला असून दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी विशेष मोहिमेच्या कालावधीत मतदान केंद्रावर जाऊन नवीन नावाची नोंदणी, दुरूस्ती, भाग बदल व वगळणी बाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे अर्ज करावे, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार दि.1 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येईल. त्यावर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.1 नोव्हेंबर, 2021(सोमवार) ते दि.30 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार) पर्यंत राहील. दरम्यान मतदार नोंदणी संदर्भात विशेष मोहिमेंचे आयोजन दि. 13 व 14 नोव्हेंबर तसेच दि. 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात येईल. दावे व हरकती दि.20 डिसेंबर, 2021(सोमवार) पर्यंत निकालात काढण्यात येतील. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि.05 जानेवारी, 2022 (बुधवार) रोजी करण्यात येणार असल्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी कळविले आहे.

*****************************

जिल्हा युवा पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

यवतमाळ दि.27 ऑक्टोबर : राज्यातील युवकांना त्यांच्या तरूण वयात समाजसेवेसाठी प्रोत्साहन मिळावे, युवकांना सामाजिक हिताची कामे करण्याची गोडी लागावी त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, सामाजिक जडण घडणीतील त्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे. युवा विकासाचे कार्य करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळावे, अशा उद्देशाने राज्य शासनामार्फत राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी शासनामार्फत देण्यात येत असतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा परीषद, यवतमाळ द्वारा सन 2019-20 व सन 2020-21 या वर्षातील जिल्हास्तर युवा पुरस्कार देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील 30 ते 35 वयोगटातील युवक, युवती तसेच किमान पाच वर्ष कार्यरत नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.

जिल्हास्तरावर युवा पुरस्कार एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी पात्रतेचे निकष व इतर अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा असे जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.

चालक परवानासाठी ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र :

लॉगिंग आयडी साठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

 

यवतमाळ दि.27 ऑक्टोबर : मोटार वाहन कायदा व केंद्रीय मोटार वाहन अधिनियम मधील तरतुदीनुसार शिकाऊ मोटार चालक परवाना व परवाना नुतनीकरण करीता नमुना 1-अे मध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. सदरहू अर्जदार यांची वैद्यकीय तपासणी ही मेडीकल बोर्डाची कमीत कमी एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त डॉक्टर्सने करावयाची आहे.

वाहन चालक परवाना जारी करण्याची कार्यवाही ही पुर्णत: ऑनलाईन पद्धतीने झाली आहे, त्यामुळे नमूना 1-अे हा ऑनलाईन पद्धतीने जारी करण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाकडून लॉगिंग आयडी प्रदान करण्यात येत आहे. तरी इच्छुक डॉक्टरांनी आपली माहिती विहित नमुन्यात सादर करून लॉगिंग आयडी साठी अर्ज सादर करावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©