यवतमाळ सामाजिक

आधार प्रमाणिकरणासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत अंतीम मुदत

आधार प्रमाणिकरणासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत अंतीम मुदत

 

यवतमाळ दि. 26 ऑक्टोबर :  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -2019 चे अंमलबजावणी संबंधाने एकुण 44678  कर्जखात्याची यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिध्दीसाठी दिनांक 23 ऑक्टोबर 2021 रोजी पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हयातील पात्र शेतक-यांचा समावेश आहे. सदर योजनेअंतर्गत सर्व शेतकरी सभासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांचे संबंधीत बँक शाखा अथवा तालुका सहाय्य्क निबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालयाशी त्वरीत संपर्क करुन आधार प्रमाणिकरणासाठी विशिष्ट क्रमांकाचे यादीत नाव आल्याची खात्री करावी. व त्यांनतर विशिष्ट क्रमांक बॅंकेचे पासबुक व आधार कार्ड घेऊन नजिकचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेतल्याशिवाय सदर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत यापुर्वीचे यादीत नाव असलेले तथापि अजुनपर्यंत आधार प्रमाणिकरण केले नाही, अशा शेतक-यांनीसुध्दा त्वरीत सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर, 2021 हा आहे.

तसेच मयत शेतकरी सभासदांचे वारसांनी त्वरीत संबंधीत बँक शाखेशी संपर्क करावा. मयत कर्जदार सभासदांच्या बाबतीत सुधारीत /अदयावत माहीती संगणकीय प्रणालीवर (पोर्टलवर ) अपलोड  करण्यासाठी दिनांक 22 ऑक्टोबर ते 08 नोव्हेंबर 2021 या कालावधीत बँकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी कळविले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©