यवतमाळ सामाजिक

“ग्राम सुखी तर जग सुखी” हा मौलिक मंत्र राष्ट्रसंतांनी दिला- प्रा.डॉ. अनंतकुमार सूर्यकार

“ग्राम सुखी तर जग सुखी” हा मौलिक मंत्र राष्ट्रसंतांनी दिला- प्रा.डॉ. अनंतकुमार सूर्यकार

हिवरी- श्री गुरुदेव सांस्कृतिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था, मंगरुळ ,ता.जि. यवतमाळ द्वारा संचालित गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने स्थानिक ग्रामपंचायत पटांगणात विश्ववंदनीय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा महानिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
सकाळी राष्ट्रसंतांच्या प्रतिमेसह गावातून मिरवणूक काढण्यात आली , मंडळाचे कार्यकर्त्यांसह गावकरी मोठ्या संख्येने ग्रामसफाईमध्ये सामील झाले होते. गावातील रस्ते रांगोळ्यांनी सजवून ठिकठिकाणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सामुदायिक प्रार्थना व मौन श्रद्धांजली वाहण्यात आली . प्रतिभाताई पुरुषोत्तम अवझाडे , सरपंच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.तर प्रतिभाताई महादेव अवझाडे, सदस्य ग्रामपंचायत या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
राष्ट्रसंतांची विचारधारा ही मानवजातीच्या कल्याणासाठी निर्माण झाली आहे. ते चमत्कारी संत नसून मानवता धर्म व राष्ट्रधर्माचे प्रेरणा स्रोत होते. भजन व व्याख्यानांचा द्वारे त्यांनी जनजागृती केली. ग्राम सुखी तर जग सुखी हा मंत्र त्यांनी दिला. समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता या वाईट बाबींवर विशेष प्रहार केले.असे प्रा. डॉ. अनंतकुमार सूर्यकार यांनी प्रसंगोचित वक्तव्य केले.
रामेश्वर गावंडे, पुरुषोत्तम अवझाडे, संजय कांबळे, विठ्ठल कोडापे, अरूण सोनटक्के, ज्ञानेश्वर कोडापे, दत्ता इंगळे, महादेव तुमडाम,गणेश सोनोने, विजय ढोके, गणेश जोगे, सुधाकर धोंगडे, अवधूत गवळी, नारायण सूर्यकार, सैय्यद अफसर, मारोती पवूळ ,राजू गुघाणे, उत्तम सोनटक्के यासह गावातील स्त्री-पुरूष कार्यक्रमामध्ये सहभागी होते. शेवटी राष्ट्रवंदना होऊन संपूर्ण कार्यक्रमाचे आभार अरूण सोनटक्के यांनी मानले.

Copyright ©