यवतमाळ सामाजिक

शासकीय रुग्णालयात औषधिचा टुटवड़ा रुग्नांना बसतोय आर्थिक फटका

यवतमाळ प्रतिनिधी पुरुषोत्तम कामठे

शासकीय रुग्णालयात औषधिचा टुटवड़ा रुग्नांना बसतोय आर्थिक फटका

यवतमाळ:श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथे गेल्या काही महिन्यांन पासून औषधिचा टुटवड़ा पडलेला आहे.ज्यामुळे डॉक्टरांना सामान्यत सामान्य औषधि रुग्नांकडून बोलवाव्या लागत आहे.इतकेच नाही तर वार्डमधे लागणाऱ्या औषधि या लोकल परचेस कराव्या लागत आहे.ज्या रुग्नांची परिस्थिति नाही त्या रुग्नांना डॉक्टर ना विलाजाने सुट्टी देऊन घरी जाण्यास सांगतात शासकीय रुग्णालयात उपचार न झाल्याने रुग्णाला आराम नाही मिळत व रुग्नांला कर्ज बाजरी होऊन खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. ज्यामुळे रुग्नांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे
सोबतच माहिती मिळाल्या नुसार रुग्णालयातील काही रक्त तपासणी केंद्र रात्रीचे वेळी बंद असल्याने डॉक्टरांना लागणाऱ्या महत्वाच्या रक्त चाचन्या रुग्नांना खाजगी रक्त तपासणी केन्द्रातुन करुण आनाव्या लागत आहे. ज्याचा रुग्नांना हजारो रूपयांचा फटका बसतोय डॉक्टर या तपासणी संजीवनि हॉस्पिटल मधून करायला सांगतात यातुन दिसून येते की डॉक्टरांचे कमीशन ची रक्कम मोठी असावी व संजीवनी हॉस्पिटल ला पन प्रति रात्र लाखोचा फायदा आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©