यवतमाळ सामाजिक

वेकोलीच्या माध्यमातुन उकणी ते पिंपळगाव विद्यार्थ्यांकरिता वाहन सेवा सुरु, सरपंच दिपक मत्ते यांच्या प्रयत्नाला आले यश.

वणी प्रतिनिधी निलेश चौधरी

वेकोलीच्या माध्यमातुन उकणी ते पिंपळगाव विद्यार्थ्यांकरिता वाहन सेवा सुरु, सरपंच दिपक मत्ते यांच्या प्रयत्नाला आले यश.

तालुक्यातील पिंपळगाव- उकणी परावर्तित रस्त्याचे अंतर वाढल्यामुळे आणि जंगली जनावरांचा त्रास असल्यामुळे वेकोली प्रकल्पग्रस्त पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाच्या द्रुष्टीने गेल्या वर्षभरापासून सरपंच दिपक मत्ते यांनी सतत पाठपुरावा करत दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बदकुरवार, विजय पिदुरकर माजी जि.प. सदस्य, मुख्य प्रबंधक सुनील कुमार वनी नार्थ एरिया, व ग्रामस्थ यांच्या समवेत सरपंच दिपक मत्ते यांनी बैठक बोलावली, या बैठकीत वेकोलिच्या माध्यमातून गावातून उकनी पर्यंत व उकणी वरून पिंपळगाव पर्यंत विद्यार्थ्यांना सोडण्याचे वेकोलीने लेखी आश्वासन दिले. त्यानुसार आज दिनांक २५ ऑक्टोंबर पासून बस सेवा सुरू करण्यात आली. बस सुरू करण्याकरिता हिरवी झेंडी दाखवितांना वेकोलीचे मुख्य प्रबंधक सुनील कुमार वनी नार्थ एरिया, अनिल हेपट एपीओ वनी नार्थ क्षेत्र, सरपंच दीपक ऋषिकेश मते, ग्रा.पं. सदस्य सचिन वानखेडे, कविता मत्ते, शालेय विद्यार्थी व समस्त पिंपळगाव येथील गावकरी उपस्थित होते.

Copyright ©