यवतमाळ सामाजिक

हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत अमोलकचद महाविद्यालय येथे लसीकरण

माहूर प्रतिनिधी पद्मा गिऱ्हे 

हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत अमोलकचद महाविद्यालय येथे लसीकरण

हिवरी प्राथामिक आरोग्य केंद्रात अंतर्गत अमोलकचद महाविद्यालयात युवा स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत लस घेतली विद्यार्थी स्वतः लाईन मध्ये लस घेत होते हे लसीकरण वनिता गिलबिले यांनी केले सतत सकाळी १०.३० ते ५ वाजे पर्यंत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला महाविद्यालयाचे प्राचार्य आर. ए. मिश्रा,प्रा.अनंत सूर्यकार राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी,तसेच डॉ.गजानन फुपरे, डॉ.अनुजा भवाने,विजया चातारकर,प्रदीप वानखेडे,गणेश खराटे, गौरव सोणवाने,शीतल फुलामाली , प्रियंका धुळे यांनी विशेष परिश्रम घेऊन लसीकरण यशस्वी केले

Copyright ©