यवतमाळ सामाजिक

स्नेहमीलन सोहळ्यानिमित्त, सेवानिवृत्त व जेष्ठ नागरिकांचा सन्मान

स्नेहमीलन सोहळ्यानिमित्त, सेवानिवृत्त व जेष्ठ नागरिकांचा सन्मान
———————–
परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व श्री राम दमकोंडवार ह्यांचे वतीने आयोजित कोजागिरी व स्नेहमीलन सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक विश्वास नगर व स्वप्न नगरी परिसरातील सेवानिवृत्त व जेष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संत दोला महाराज वृद्धाश्रम उमरी पठार चे संस्थापक शेषराव डोंगरे, राठी फाउंडेशन चे सुरेश राठी,यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा,प्रा घन:श्याम दरणे,समन्वयक सामाजिक संस्था व संघटना यवतमाळ उपस्थित होते,परिसरातील आदिशक्ती उद्यान परिसरात झालेल्या ह्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभागातून कोरोना काळात जेष्ठ नागरिकांनी उद्यान परीसराची काळजी घेऊन बगीचा हिरवागार ठेवण्यास मोलाचे कार्य केले त्याबद्दल ह्या सर्व जेष्ठ नागरिकांचा संस्कृतीचे संस्कार मोती हा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला,तर विश्वास नगर व स्वप्न नगरी परिसरातील तब्बल 34 सेवानिवृत्त नागरिकांचा सेवा वंदन पुरस्कार देऊन सन्मान।करण्यात आला, श्रमदान करण्यासाठी श्रमसमिधा सन्मान तर,दातृत्व प्रेरणा सन्मान ह्यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्याचे आले,ह्यात प्रामुख्याने मारोतराव भोयर,आठवले काका,गणेश तंबाखे,सुरेंद्र अंबुलकर,केशव बन,प्रकाश फेंडर,राजू देशमुख,आनंदराव अरसोड,पुरुषोत्तम वानखडे,अनिल दरणे, मोहन भावे,चंद्रशेखर लीचडे, सुनील उत्तरवार, प्रदीप दरणे, रमेश राऊत,हनुमंत ढबाले,दीपक भरणे,कैलास पराते, मधुकर सावरकर,राम दमकोंडवार, उत्तम भोयर,संजय अलोने,निरंजन भोयर, प्रभाकर टिप्रमवार, नितीन खर्चे, प्रमोद ढवळे, सुनील पोदुतवार, अशोक गोडंबे,गंगाधर जांभूळे, गणेश यादव,सखा देव,जी पी उरकुंदे,साहेब राव राठोड,एकनाथ रणदिवे इत्यादींचा सत्कार आदिशक्ती उद्यान समिती च्या वतीने करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ नितीन खर्चे ह्यांनी तर सूत्र संचालन प्रलय टिप्रमवार व सौ अंजली फेंडर व आभार प्रदर्शन सतिष ईसाळकर ह्यांनी केले,कार्यक्रमाच्या नंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा व कोजागिरीच्या आस्वाद घेतला,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी,केशव बन,राजू इसाळकर,निलेश आडे,मंगेश भारती, चिकू दमकोंडवार, मंगेश खर्चे,प्रज्योत टिप्रमवार, मंगेश बन, शेखर पोदूतवार, अमितेश बोदडे, वेदांत इसाळकर,व स्थानिक महिलांनी परिश्रम घेतले

Copyright ©