यवतमाळ सामाजिक

न्यायालय आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत घोटी येथे कायदेविषयक शिबिर

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

न्यायालय आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत घोटी येथे
कायदेविषयक शिबिर
———————————————–
घाटंजी- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांचे निर्देशावरून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई आदेशावरून पँन इंडिया आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती तथा वकील संघ घाटंजी यांच्या वतीने घोटी ग्राम पंचायत मध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायदंडाधिकारी एफ.टी.शेख मॅडम, पारवा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण वकील संघाचे अध्यक्ष अड, अनंतकुमार पांडे अड, खान बिट जामदार रामकृष्ण चौके तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद राठोड पोलीस पाटील राजू राठोड ग्रामसेविका नंदा कांगणे व
पारवा पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी वृंद पत्रकार पोलीस पाटिल तंटामुक्ती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते व गावकरी उपस्थितीत होते. ग्रामीण भागातील जनतेला कायद्याची माहिती व्हावी त्यांच्यात कायद्याविषयी जनजागृती व्हावी या उदांत्त उद्देशातून तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गाव घोटी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांचे मजूरदार वर्गाची परिस्थिती हलाखीची असते. आणि त्यांचे एखादी प्रकरण न्यायालयात दाखल झाले की त्यांनी घाबरून जावू नये सोबतच अत्याचार ग्रस्त महिला एखादी हल्ला झाला असेल आणि याविरोधात न्याय मागण्यासाठी न्यायालयात वकिला मार्फत प्रकरण दाखल करावे लागते परंतु ज्यांची परिस्थिती नाही ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत आहे अश्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यास त्यांना न्याय विभागाकडून ५० हजार रुपये ते तीन लाख रुपयांपर्यंत सहाय्य करून न्यायालया मार्फत वकील मिळवून दिल्या जाते याची माहिती देण्यात आली. शिवाय काही किरकोळ प्रकरणे सुध्दा भिती पोटी तसेच राहतात. मात्र न्यायालयात अश्या नागरिकांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यास त्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते. यातून आपसी समझोता सारखे प्रकरनाचा निपटारा होवू शकते. नागरिकांनी या सर्व न्याय विभागाने राबविलेल्या विविध योजनेचा लाभ घेतला पाहिजे अश्या सूचना करीत सोबतच विविध विषयाला अनुसरून न्यायमुर्ती एफ. टी. शेख यांनी मार्गदर्शन केले. ठाणेदार विनोद चव्हाण यांनी पीडित महिला व बालक यांच्या करीत असणाऱ्या कायद्याची माहिती दिली तसेच बालकांसाठी बाल न्याय मंडळ बालकल्याण समिती बाल पोलीस अधिकारी व विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत असणाऱ्या विविध कायदे व योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुंगेश तोडसाम यांनी केले तर आभार धनराज पवार यांनी मानले.

Copyright ©