महाराष्ट्र सामाजिक

बलात्काराच्या आरोपा मधे अटकपूर्व जामीन मंजूर

बलात्काराच्या आरोपा मधे अटकपूर्व जामीन मंजूर

खोट्या बलात्कार अरोपाविरोधी तसेच धमकी देण्याच्या प्रकरणांमध्ये..
ॲड. मुमताज जावेद शेख,आर्णी यांच्या कार्यास अखेर यश..

अमरावती येथील राजापेठ पोलिस स्टेशन येथे दाखल बलात्कार तसेच धमकी देण्याच्या प्रकरणांमध्ये मा.जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती कडून अटकेपूर्व जामीन मंजूर.
विधिसुत्रा नुसार आरोपी रा. पल्ली बेनचीटी, पश्चिम बंगाल येशील व फिर्यादी ही अमरावती ची असून यांचा विवाह हा 2014 मध्ये झाला असून त्यातून त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. आंतरिक वादांमुळे २०१७ मध्ये पटना हायकोर्ट येथून त्यांनी घटस्पोट घेतला होता. फिर्यादीच्या मते आरोपी हा घटस्पोटाच्या दोन वर्षानंतर मुलीची आठवण येत आहे म्हणून घरी आला व घरी आल्यानंतर त्याने जबरदस्तीने फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार केला तसेच काही बोलल्यास मुलीला जीवाने मारेल याप्रकरणी फिर्यादीने पोलीस स्टेशन येथे भा.द.वी. कलम 376 (ब), 377, 506(2) अतर्गत तक्रार नोंदवली होती.
यासंदर्भात आरोपी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय येथे ॲड. मुमताज जावेद शेख यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ज्यामध्ये मा. जिल्हा व सत्र न्यायालय क्र.4 मध्ये न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणामध्ये आरोपीस न्याय मिळवून दिल्या बद्दल आरोपी तर्फे ॲड. मुमताज जावेद शेख यांचे प्रभावी युक्तिवाद बद्दल आभार मानले…!

Copyright ©