यवतमाळ सामाजिक

दिग्रस येथे दारव्हा पोलिसांनी पकडला गुटख्याचा ट्रक

संपादक सदानंद जाधव

दिग्रस येथे दारव्हा पोलिसांनी पकडला गुटख्याचा ट्रक

ट्रक मधील मालाची तपासणी 7:30 पर्यंत सुरूच आहे अजून किती माल निघेल या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे

अमरावतीच्या विजय गुड्स गॅरेज मधून विविध मालाने भरलेला ट्रक आज शनिवार ,दि.२३ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता दिग्रस हद्दीत येताच दारव्हा वाहतूक पोलिसांनी या ट्रकला नवीन बसस्थानक जवळ येताच हात दाखवून अडविला व विचारपूस केली. विचारपूस करतांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तो ट्रक दिग्रस स्टार ट्रान्सपोर्ट येथे आला माल उतरविण्या ऐवजी ट्रक मधील मालाची खात्री करण्यासाठी सरळ दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला. यावेळी ट्रकची तपासणी केली असता तंबाखुजन्य पदार्थांचे व गुटख्याचे कट्टे ट्रकच्या मधातल्या भागात आढळून आले.घुटका आढळून येतात वाहतूक पोलिसांनी आपले वरिष्ठ सांगळे यांना याबाबत सूचना देऊन दिग्रस येथे बोलावून घेतले. सांगळे यांनी अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी गोपाल माहुरे यांना माहिती देऊन बोलावून घेतले. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान पकडलेल्या ट्रकमध्ये आत्तापर्यंत 6 लाख 23 हजार रुपये किमतीचा गुटख्याचा माल आढळुन आला त्यानंतर देखील मालाची तापसणी सायंकाळी 7:30 पर्यंत वृत्त लिहेपर्यंत सुरूच होती.

या आधी सुद्धा अनेकदा दिग्रस पोलिसांनी गुटखा पकडला मात्र त्या गुटख्याच्या विक्रीवर व मालाच्या वाहतुकीवर कोणताही फरक पडलेला नाही. संबंधित अन्न व पुरवठा प्रशासन विभागाचे या बाबीकडे साफ दुर्लक्ष असल्याने दिग्रस तालुक्यात गुटखा विक्री फोफावली आहे. आजून या ट्रक मध्ये किती गुटखा माल निघेल हे कारवाई नंतर उजेडात येईल.

Copyright ©