यवतमाळ सामाजिक

न्यायालय प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यास कटिबध्द न्यायमुर्ती- एफ. टी. शेख

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

न्यायालय प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यास कटिबध्द
न्यायमुर्ती- एफ. टी. शेख
———————————————–
घाटंजी- ग्रामीण भागातील जनतेला कायद्याची माहिती व्हावी त्यांच्यात कायद्याविषयी जनजागृती व्हावी या उदांत्त उद्देशातून तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वगारा टाकळी येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कायदेविषयक मार्गदर्शन करतांना न्यायालय प्रत्येक व्ययक्तीस न्याय देण्यास सक्षम असल्याचे उदगार घाटंजी न्यायालयाच्या न्यायाधिश एफ. टी. शेख यांनी काढले.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांचे मजूरदार वर्गाची परिस्थिती हलाखीची असते. आणि त्यांचे एखादी प्रकरण न्यायालयात दाखल झाले की त्यांनी घाबरून जावू नये सोबतच अत्याचार ग्रस्त महिला, ज्यांचेवर एखादी हल्ला झाला असेल आणि याविरोधात न्याय मागण्यासाठी न्यायालयात वकिला मार्फत प्रकरण दाखल करावे लागते परंतु ज्यांची परिस्थिती नाही ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत आहे अश्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यास त्यांना न्याय विभागाकडून ५० हजार रुपये ते तीन लाख रुपयांपर्यंत सहाय्य करून न्यायालया मार्फत वकील मिळवून दिल्या जाते याची माहिती देण्यात आली. शिवाय काही किरकोळ प्रकरणे सुध्दा भिती पोटी तसेच राहतात. मात्र न्यायालयात अश्या नागरिकांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यास त्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते. यातून आपसी समझोता सारखे प्रकरनाचा निपटारा होवू शकते. त्यामुळे नागरिकांनी या सर्व न्याय विभागाने राबविलेल्या विविध योजनेचा लाभ घेतला पाहिजे अश्या सूचना करीत सोबतच विविध विषयाला अनुसरून न्यायमुर्ती एफ. टी. शेख यांनी मार्गदर्शन केले. या आयोजित कार्यक्रमात पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी या परिसरा विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला घाटंजी न्यायालयाचे संगीता भगत, संतोष आकोलकर तर गावचे सरपंच गजानन गाऊत्रे, उपसरपंच शेख आतिक, भगवान शेट सक्कनवार, जिवन मुद्दलवार, यांचे सह तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, कृषी विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व गावातील शेकडो महिला व पुरुष मंडळीनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील वैभव डब्बावार यांनी केले तर आभार पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी मानले.

Copyright ©