Breaking News यवतमाळ सामाजिक

कोठारी(ची)शिवारात शेत शेजाऱ्यानेच जाळले शेतकऱ्याचे 50 क्विंटल सोयाबीन

किनवट प्रतिनिधी (राज माहुरकर)

कोठारी(ची)शिवारात शेत शेजाऱ्यानेच जाळले शेतकऱ्याचे 50 क्विंटल सोयाबीन

किनवट पोलीस ठाणे हद्दीत गोकुंदा येथील रहिवासी लक्ष्‍मण केंद्रे यांचे कोठारी शिवारातील शेत सर्वे नंबर 331 शेतामध्ये सोयाबीन काढण्यासाठी ठेवलेल्या दोन ढिगाऱ्याला शेत शेजारी असलेल्या चार शेतकऱ्यांनी जाळून राख केले असल्याची तक्रार क्ष्‍मण केंद्रे यांनी किनवट पोलीस ठाण्यात दिनांक 21/10/2021 रोजी सायंकाळी 9 च्या सुमारास समक्ष हजर होऊन दाखल केले नुसार आरोपीविरुद्ध भा द वि 1860 चे कलम 435,427,34 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
कोठारी ची शिवारातील शेत सर्वे नंबर 331 हा लक्ष्‍मण केंद्रे यांच्या मालकीचा असून त्यांनी पाच एकर मध्ये सोयाबीनचे पीक घेतले होते सोयाबीन काढण्यासाठी शेतामध्ये दोन ढीग लावून ठेवले होते दिनांक 21/10/2021 रोजी दुपारी दोन वाजता ट्रॅक्टरने मळणी यंत्र शेतामध्ये घेऊन जात असताना शेत शेजारी भगवान दगडोबा मुंडे, विष्णुदास नामदेव गीते या दोघांनी माझ्या ट्रॅक्टरला मळणीयंत्र घेऊन जाण्यास नकार दिल्याने लक्ष्‍मण केंद्रे यांनी थेट पोलिस ठाणे किनवट व तहसीलदार किनवट यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती याचाच राग मनात धरून सायंकाळी ठीक आठ वाजता च्या सुमारास शेतामध्ये कोणीच नसल्याचे पाहून दबा धरून बसलेले भगवान दगडोबा मुंडे, विष्णुदास नामदेव गीते, पंढरी मारुती केंद्रे, शत्रुघन पंढरी केंद्रे यांनी शेतातील सोयाबीन च्या दोन्ही ढिगाला आग लावून पळून जात असताना स्वतः लक्ष्मण केंद्रे व त्यांचा मुलगा यांनी पाहिले असल्याचे पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवील्यानुसार पोलीस ठाण्याचे नायक पोलीस कॉन्स्टेबल बक्कल क्रमांक 680 सुनील गोपालराव कोलबुद्धे यांनी दिनांक 22/10/2021 रोजी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत घटनास्थळ पंचनामा करून 50 क्विंटल सोयाबीनचे जाळून नुकसान केल्याचे पंचनाम्यात नमूद करून दोन लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तयार केला यावेळी पंच म्हणून अतुल हरि दर्शनवाढ व माधव मारुती कागणे यांनी पंचनामा वर स्वाक्षऱ्या केल्या आहेत सदर घटनेमधील आरोपीवर भादवी 1860 चे कलम 435,427,34 प्रमाणे ुन्हा नोंद करून पुढील तपास चालू असून शेतकरी लक्ष्‍मण केंद्रे यांचे झालेलि नुकसान भरपाई कशी होणार का? पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्या सारखे प्रकार घडणार याकडे इतर शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन प्रकरणात पीडित शेतकऱ्यांला नुकसान भरपाई मिळवून देण्यास तत्परता दाखवावी असे नागरिकातून बोलल्या जात आहे.

Copyright ©