Breaking News यवतमाळ सामाजिक

गोवंश तस्करांच्या ट्रक ला पोलिसांनी सिनेस्टाईल पकडुन केली कारवाई ,गोवंश तस्कराचे दणाणले धाबे

गोवंश तस्करांच्या ट्रक ला पोलिसांनी सिनेस्टाईल पकडुन केली कारवाई ,गोवंश तस्कराचे दणाणले धाबे

पो.स्टे. पांढरकवडा हद्दीतून नागपूर-हैद्राबाद रोडने मोठया प्रमाणावर गोवंश तस्करीद्वारे कत्तलीकरिता जात असते. यापुर्वीसुध्दा गोवंश तस्करांवर वारंवार कारवाई करून गोवंश ची सुटका करण्यात आली आहे. तरी सुध्दा गोवंश तस्कर गोवंशची तस्करी करून कत्तलीकरिता हैद्राबाद येथे घेवून जात असतात. त्यामुळे गोवंश तस्करांवर प्रभावी कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाÚयांनी सुचना दिलेल्या आहेत. त्यास अनुसरून गोवंश तस्करी व वाहतूक करणारे वाहनांची माहिती काढण्याकरिता गोपनिय बातमीदार पेरण्यात आले होते.

दिनांक 22/10/2021 रोजी रात्री 22.00 वा. चे सुमारास सपोनि श्री हेमराज कोळी पो.स्टे. पांढरकवडा येथे हजर असतांना पेरण्यात आलेल्या बातमीदारामार्फत खबर मिळाली कि, 10 चक्का ट्रक क्रमांक एम एच 40 वाय 3382 मध्ये गोवंश जातीचे जनावरे अवैध्दरित्या कोंबून कत्तलीकरिता रूंझा-घाटंजी मार्गे हैद्राबाद कडे घेवून जात आहे. अषी माहिती मिळाले वरून सपोनि श्री हेमराज कोळी, सोबत पोउनि संदीप बारिंगे, पोउनि निलेश गायकवाड, पो.ना. 2228 राजू, पो.काॅ. 2272/निलेश, पो.काॅ. 2526/सिध्दार्थ असे 22.12 वाजता खाजगी वाहनाने रवाना होवून उमरी गांवाजवळ वणी-यवतमाळ रोडवर पेट्रोल पंपाचे समोर उमरी येथील 2 पंचांसह सापळा लावून थांबलेले असतांना गोपनिय बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे एक 10 चक्का ट्रक क्रमांक एम एच 40 वाय 3382 हा दिनांक 23/10/2021 चे 00.15 वा. चे सुमारास उमरी कडून सायखेडा कडे जातांना दिसला. सदर ट्रकला पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला असता ट्रक चालकाने पोलीसांना पाहून त्याचा ट्रक न थांबवता भरधाव वेगात सायखेडा च्या दिशेने पळवून नेल्याने सदर ट्रकचा पोलीसांनी खासगी वाहनाने पाठलाग सुरू केला. सदर ट्रक चालक त्याचा ट्रक भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेवून चालवित पोलीसांच्या वाहनाला चकवा देत सायखेडा कडे जात होता तरीही पोलीसांनी सदर ट्रकचा पिच्छा सोडला नाही व थरारक पाठलाग सुरूच ठेवला असतांना सायखेडा गांवामध्ये स्पीड बे्रकर आल्याने सदर ट्रक चालकाने कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचा ट्रक पोलीस पकडतील याबाबत त्याची खात्री झाल्याने त्याने त्याचा ट्रक थांबवून ट्रक सोडून ट्रक चालक पळून गेला व क्लीनर सुध्दा पळून जात असतांना क्लीनरला त्यास पो.स्टाफच्या मदतीने पकडले. त्यास त्यांचा नांव-पत्ता विचारला असता त्याने त्याचा नांव-पत्ता राहुल राजेश खन्ना, वय 20 वर्षे, रा. कामठी, जि. नागपूर असा सांगितला. त्यास पळुन गेलेल्या ट्रक चालकाचा नांव-पत्ता विचारला असता त्याने पळुन गेलेल्या ट्रक चालकाचा नांव-पत्ता इर्शाद ईस्त्राईल खान, वय 38 वर्षे, रा. बोरी कालान, जि. सिवनी, मध्य प्रदेश असा सांगितला. त्यानंतर सदर ट्रकची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता सदर ट्रकच्या आतमध्ये लहान-मोठे गोवंशीय बैल एकमेकांचे पायाला पाय आखुड दोरीने बांधुन दाटीवाटीने व जखमी अवस्थेत हालचाल करण्याकरिता पुरेशा जागा नसलेल्या अवस्थेत निदर्यतेने व क्रुरपने चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबल्याचे दिसले. वरून पोलीसांनी सदरचे गोवंशिय बैल मुक्त करून पाहणी केली असता एकुण 24 गोवंशिय बैल किं. प्र. 15000/- रू. एकुण किंमत 3,60,000/- रू. मिळुन आले. सदरचे गोवंशिय बैल व 10 चक्का ट्रक क्रमांक एम एच 40 वाय 3382 किं.अं. 14,00,000/- रू. असा एकुण 17,60,000/- रू. चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदरबाबत सविस्तर पंचनामा कार्यवाही करण्यात आली. नमूद ट्रक चालक व क्लिनर विरूध्द अप.क्र. 1047/21 कलम 279, 34 भादंवि सह कलम 11 (1) (घ) (ड) (च) (ज) (ट) (झ) प्राण्याना क्रुरतेने/निदर्यतेने वागविण्याचा प्रतिबंधक अधि. 1960 सहकलम 5 (अ)(ब) महा. प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सहकलम 119 म.पो.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो. श्री दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक सो. श्री खंडेराव धारणे, उपविभागिय पोलीस अधिकारी, पांढरकवडा विभाग श्री प्रदीप पाटील सो., पोलीस निरीक्षक श्री जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमराज कोळी, पोउनि संदीप बारिंगे, पोउनि निलेश गायकवाड, पो.ना. 2228 राजु सुरोशे, पो.काॅ. 2272 निलेश निमकर, पो.काॅ. 2526 सिध्दार्थ कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

Copyright ©