यवतमाळ सामाजिक

बांगड्या च्या दुकानात घुसला भला मोठा साप

जिल्हा प्रतिनिधी

बांगड्या च्या दुकानात घुसला भला मोठा साप

सविस्तर वृत्त अशे की आज दि.22.10.2021 ला सकाळी 12 वाजतच्या सुमारास दुकान मध्ये बंगड्याच्या माल मध्ये एक भला मोठा साप शमा बांगडी मॅचिंग सेन्टर चे मालक याना आढळला असता एकच खळबळ उडाली आजूबाजूचे दुकानातील नागरकांनी साप बघायला गर्दी केली गर्दीत जमलेल्या पैकी वैष्णवी चहा पॉईंट चे मालक यांनी MH29 हेलपिंग हँडस टीम च्या हेल्पलाईन नंबर 9850577616 वर सम्पर्क साधला व माहिती दिली सदर माहिती संस्थेचे उपाध्यक्ष निलेश मेश्राम यांना मिळताच क्षणाचाही विलंब न गमावता घटना स्थळी पोहचले दुकानातील मालाची पाहणी केली असता त्यामध्ये 5 ते 6 फूट लांबी चा बिनविषारी धामण ( रॅट स्नेक ) मोठ्या शिताफीने पकडला जो पूर्ण पणे बिनविषारी असून ,उंदरांचा नायनाट करण्यास मदत करतो ,शेकऱ्यांचा मित्र म्हटलं जाणारा या सापास लांबी ला मोठा असल्या कारणाने व साप बद्दल जनजागृती नसल्या कारणाने मारला जातो अशी माहिती जमलेल्या समस्त नागरिकांना निलेश मेश्राम यांनी दिली व जनतेला आव्हान केले की कुठेही वन्यजीव संकटात आढळला असता जवळील वनविभाग ला किंवा MH29 हेलपिंग हँडस टीम च्या प्रशिक्षण वन्यजीव मित्राला बोलवावे या सापाला वनविभाग येथे नोंद करून निसर्ग मुक्त करण्यात येईल यावेळी शमा बांगडी मॅचिंग सेन्टर चे शेख मोसिंन, तसेच आजूबाजूचे दुकान मालक व नागरिक उपस्थित होते

Copyright ©