यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथील वर्षावास समारोपीय कार्यक्रमात ठाणेदार चव्हाण यांचा सत्कार..!

सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ खान

सावळी सदोबा येथील वर्षावास समारोपीय कार्यक्रमात ठाणेदार चव्हाण यांचा सत्कार..!

“धम्म ज्योत बुद्ध विहार” सावळी सदोबा येथे वर्षावास समारोपीय कार्यक्रमात पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांचा समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष तथा सावळी सदोबाचे माजी सरपंच शेषराव मुनेश्वर व समितीच्या सदस्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सावळी सदोबा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी “बुद्ध आणि धम्म” या ग्रंथाचे सतत तीन महिने “धम्मज्योत बुद्ध विहार” येथे वाचन सुरू करण्यात आले होते. त्यानिमित्त वर्षावास समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पारवा पोलीस स्टेशनला नुकतेच महिण्याभरापूर्वी रुजू झालेले ठाणेदार विनोद चव्हाण यांनी सावळी सदोबा पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या गावातील अवैध धंद्या विरोधात धडक मोहीम राबविली आहे. अवैध दारूचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सावळी सदोबा भागातील पोलीसांचे आर्थिक देवाण – घेवाणीतून नेहमीच दुर्लक्ष होत असते. पण पारवा ठाणेदारपदी विनोद चव्हाण हे रुजू होताच अवैध दारू भट्ट्या व दारूचे अड्डे चालवणार्‍याला चांगलेच बदडून काढले आहे व अवैध दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या आहे. अवैध दारू सोबतच गाव गुंडानाही पोलीसी हिसका दाखविला. जुगार, मटका आदी धंदे करणाऱ्यालाही ठाणेदाराने चांगलाच चोप दिला आहे. ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या कामाची व कार्याची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाच्यावतीने ठाणेदार चव्हाण यांचा पुतळा समितीचे अध्यक्ष तथा सावळी सदोबा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेषराव मुनेश्वर व वसंतराव मुनेश्वर आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार विनोद चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी केले. प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती विनोद चव्हाण यांनी आपल्या भाषणातून समाजाला, विशेषतः नव युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तीन महिन्यापर्यंत ग्रंथ वाचन करणारे वसंतराव मुनेश्वर यांचा ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार निळकंठ वाघमारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुकर वाघमारे, अनिल कटके, तुषार वाघमारे, मनोहर बहादे, राजेंद्र रामटेके, राहुल मुनेश्वर, समाधान रिंगणमोडे, मंगेश नगराळे,मयूर कानींदे, विद्याधर रामटेके, संदिप कांबळे,आदित्य वाघमारे, विशाल बनकर,अभय बहादे,मनोज चिंचोळे, संतोष इंगळे, विशाल कानींदे व सम्यक युवा मंचचे सदस्य, सावळी सदोबा सर्कल मधील बौद्ध बांधव आदींनी मोलाचे सहकार्य केले.

Copyright ©