यवतमाळ सामाजिक

सालईराणी (बेला) एच. डी. एफ. सी. बँक शाखेचा ठेवीदारांना पैसे कपातीचा दणका

सालईराणी (बेला) एच. डी. एफ. सी. बँक शाखेचा ठेवीदारांना पैसे कपातीचा दणका
———————————————
आपला पैसा सुरक्षित रहावा, पैश्याची काटकसर म्हणून आपण बँकेत खाते उघडून आपल्या कडील जमा पुंजी बँकेत ठेवतो. मात्र उमरेड तालुक्यातील सालईराणी (बेला) एच. डी. एफ. सी. बँक शाखेत चक्क ठेवितूनच वारंवार पैसे कटत असल्याचे प्रकार पुढे आले आहे.
या बँक शाखेत आपले पैसे सुरक्षित रहावे जमा पैश्यावर व्याज मिळावेत म्हणून कैलास महादेव साठवणे यांनी एक वर्षापूर्वी बचत खाते उघडले. तोच व्यवहार करीत असताना काही कारण नसताना त्यांचे व्याज जमा होण्याऐवजी त्यांच्याच जमा पैशातून पैसे कटत असल्याचे लक्षात आले. तोच भयभीत झालेले साठवणे यांनी बँक व्यवस्थापकाला ही बाब सांगितली असता त्यांनी सकारात्मक न सांगता आपले पैसे कटले ते परत जमा होईल असे सांगून वेळ मारून नेली. मात्र ते त्या बँकेत चक्कर मारून थकले परंतु त्यांचे पैसे जमा झाले नसल्याचे सांगत आहे. या खातेदाराला बँक प्रशासनाने कोणतीही कल्पना न देता २९५०,७६७,१७७,५९० रुपये अश्या प्रमाणे पैसे कपात करून माझी फसवणूक केल्याची साठवणे यांचे म्हणणे असून यात बँक व्यवस्थापकाचाच हात असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली असून केवळ हा प्रकार माझ्या सोबतच नव्हे तर असंख्य ग्राहकासोबत हा प्रकार घडला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे घाम गाळून पै पैं जमवून आपण बँकेत पैसे ठेवतो पण असा प्रकार घडल्यास काय करावे त्यामुळे इतरही ग्राहकांनी सतर्क होवून वारंवार आपले खाते तपासावे असेही त्यांनी आवाहन केले असून आपले कपात पैसे परत मिळावे अशी मागणी केली आहे.

Copyright ©