यवतमाळ सामाजिक

अनुसूचित जाती कल्याण समितीने केली विविध विकास कामांची पाहणी

मुख्य संपादक ओंकार चेके सर

अनुसूचित जाती कल्याण समितीने केली विविध विकास कामांची पाहणी

गावकऱ्यांशी साधला संवाद

यवतमाळ, दि 21 ऑक्टोबर :- विधीमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीने काल घेतलेल्या विविध विभागाच्या आढाव्यानंतर आज आठ तालुक्यातील विकास कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. समिती मधील 8 सदस्यांची विभागणी तीन चमूत करण्यात आली होती. या तीन चमूने यवतमाळ, कळंब, आर्णी, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, पांढरकवडा आणि झरी जामनी या तालुक्यांचा दौरा करून कामांची पाहणी केली.

पहिल्या चमुत समिती अध्यक्ष आमदार दौलत दरोडा, आमदार किरण सरनाईक आणि आमदार श्रीनिवास वानगा हे होते. या चमूने यवतमाळ तालुक्यातील गट ग्रामपंचायत चापर्डा येथील रस्त्याची पाहणी केली. कळंब ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करताना रुग्णालय हायवेला लागून असल्याने तेथे ट्रामा केअर युनिट बांधण्याच्या सूचना दिल्यात. तसेच मुला – मुलींच्या वस्तीगृह इमारत बांधकामाची पाहणी केली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे भेट देवून पाहणी केली. अ.भा. धोबे यांचे सरकारी रास्त भाव धान्य दुकानातील धान्याचे स्टॉक रजिस्टर व बायोमेट्रिकचीही त्यांनी पाहणी केली.

धोत्रा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देवून सुदाम विद्यालय येथे रोस्टरनुसार पदे भरलीत का याबाबत विचारपूस करून जोडमोहा-वनपरिक्षेत्र अंतर्गत मौजा धोत्रा येथे रोपवनची पाहणी, नांझा येथील पशुचिकित्सालय व प्राथमिक आरोग्य केंद्राची व शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमीक आश्रमशाळेची पाहणी करून विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.

ग्रामपंचायत गणेशवाडी येथील शबरी घरकुल योजनेची व ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत मंगल कार्यालय बांधकामाची पाहणी केली. आंतरगाव येथील आश्रमशाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पाहणी केली. जोडमोहा येथे वनविभागाची रोपवाटिका, खटेश्वर ब्येतीलतर चीचघाट येथे ओपन जिम, क्रीडा संकुल, बिरसा मुंडा योजनेतील विहिरींची पाहणी केली. तसेच यवतमाळ शहरातील मुलींच्या वसतिगृहाची पाहणी पहिल्या चमूने केली.

दुसऱ्या चमुत आमदार अशोक उईके राजेश पाडवी, भीमराव केराम, आणि रमेशदादा पाटील यांच्या चमूने आर्णी, दिग्रस आणि दारव्हा तालुक्यातील आर्णी, कोळवन, परसोडा, जवळा,देवगाव, कोपरा, दिग्रस शहर, वसंतपुर, पारधीबेडा, चिंचोली, आनंदवाडी कामाटवाडा, लारखेड या गावातील ग्रामीण रुग्णालय, ठक्करबाप्पा योजना, सोलर प्रकल्प, बिरसा मुंडा योजनेतील विहीर, प्राथमिक आरोग्य केंद्र, रेशन दुकान, शेळी गट वाटप इत्यादी कामांची पाहणी केली.

तिसऱ्या चमुत आमदार अशोक उईके व राजकुमार पटेल यांचा समावेश होता. या चमूने घाटंजी, पांढरकवडा, आणि दिग्रस या तालुक्यातील कोळंबी, घाटंजी शहर, अनजी, पारवा, कालेश्वर, जाम, पांढरकवडा, वांझरीपोळा, शिबला, गणेशपुर, निमनी, झरी, पांढरवाणीब या गावांना भेट दिली. या गावातील नळयोजना, पाणी पुरवठा योजना, रस्त्याचे काम, कुमारी मातांचा निर्माण झालेला प्रश्न इत्यादींबाबत गावातील लोकांशी संवाद साधला.

सदर दौऱ्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा चे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, कार्यकारी अभियंता वि.प.अडचुले, तहसिलदार चव्हाण, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती कटोले, तसेच पाणीपुरवठा, कृषी आरोग्य , सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधीत विभागाचे अधिकारी दौऱ्यात सहभागी झाले होते.

Copyright ©