यवतमाळ सामाजिक

सावधान आपलीही होऊ शकते अशी फसवणुक

सावधान आपलीही होऊ शकते अशी फसवणुक

हिवरी येथील मोबाईल चोरांनी आगळी वेगळी शक्कल लढवून दिवसा ढवळ्या मोबाईल नेल्याची घटना हिवरी येथे काल घडली
सवि.असे की येथील युवकांना कामे नाही मजुरांना मजुरी नाही याचाच एक भामट्याने शक्कल लढून येथील एका चौकात काही युवक बसुन असल्याची एका भामट्याने तेथील चार तरुणांना रोजगार देण्याचे आमिष दाखवले टोल नाक्यावर सामान आणून टाकायचे आहे या करीता चार झनाची गरज असून दोन ते तीन तासांचे काम आहे प्रत्येकी चारशे रूपये देतो असे म्हणता चार युवक तयार झाले आणि त्या भामट्याने एकाला 100 रुपये देत पेट्रोल टाकून एकाला तू घे आणि दुसरा माझ्या स्कुटिवर घेतो या चारही तरुणांना घेऊन वडगाव पर्यंत नेले दोघांना नाष्टा करण्यास सांगून हा आम्ही बाहेरून येतो असे सांगत हिवरी येथील सरपंच याच्या मुलाला घेऊन राणा प्रताप नगर कडे गेले जाताना दोन बिस्कीट पुढे घेतले जातांना स्कुटीवर माघे बसून असलेल्या ला फोन करण्यासाठी मोबाईल मागितला याच वेळी एक बिस्कीट पुढा खाली पाडला ,बिस्कीट पडल्याचे निमित्त करत त्याला ते आणावयास सांगितले तो बिस्कीट उचलण्यास गेला आणि हा स्कूटी घेऊन गायब झाला १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हा भामटा घेऊन पसार झाला तर दुसरी घटना अशी की गावात स्टो,शेगडी दुरुस्त करण्यासाठी एक भामटा आला दोन दिवस गावात फिरून तीन ते चार स्टो,शेगडी दुरुस्त करून आणून दिल्या नंतर बऱ्याच शेगड्या, स्टो गोळा केल्या आणि घेऊन गेला तर अजूनही परत आलाच नाही,अशीच एक गंमत निराधार योजने त तुम्हाला दोन हजार रुपये महिना सुरू करून देण्याचे आमिष देत १५० लोकान कडून हजार ते पंधराशे रुपये गोळा केले आणि अनेकांचे कागद पत्र घेऊन पसार झाला अजुन पर्यंत आलाच नाही अशा अनेक प्रकारे शक्कल लढ्वत फसवणुकीचे प्रकार करीत असुन कुणीही आमिषाला बळी न पडता एखाद्या हुशार वेक्तीचा सल्ला आपल्याला फसवणुकीचा पासुन वाचऊ शकतो म्हणून प्रत्येकानी सावधान राहणे आवश्यक आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©