यवतमाळ सामाजिक

परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुसकान,नुसकानग्रस्त शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

सावळी सदोबा आशिफ खान

परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुसकान,नुसकानग्रस्त
शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
(आर्थिक मदतीची मागणी)

आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरामध्ये परतीच्या पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत होऊन, बळीराजा संकटात सापडला आहे,ऐन सोयाबीन काडणीच्यावेळी पाऊस पडल्याने पीक शेतात पडून सडले आहे,दिवाळीसारखा सण तोंडावर असताना, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, वर्षभर शेतात राब राब राबून पिकवलेल्या सोयाबीन व कापूस पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत, सोयाबीन पिकाची काढणी चालू असताना मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहेत, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावल्याने शेतकरी हवालदिल बनलला आहे, सावळी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप नावातील पिके पाण्याखाली गेली आहेत, परिसरातील शेकडो एकर पिकांचे नुकसान झाले आहेत, सोयाबीन तथा कापूस पिकाची बोंडे सडलेली आहेत,त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत,परिसरातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत,यावेळी उपस्थित बाळासाहेब शिंदे,रामचरण चव्हाण,वामन नाईक,मुबारक तंवर,विजय राऊत,राजू चव्हाण,सुरेश जैस्वाल,उत्तमराव भेंडे,प्रेम राठोड,अभिजीत शिंदे,अविनाश भगत,इंदल नाईक,गणपत पाटील,सुरेश काळे,संदीप कांबळे, सुरेश राठोड,रमेश राठोड,सुनील वगारहांडे,यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते

Copyright ©