महाराष्ट्र सामाजिक

बळीराम पाटील महाविद्यालयात  आद्य कवी महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी

किनवट प्रतिनिधी राज माहुरकर

बळीराम पाटील महाविद्यालयात  आद्य कवी महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी

बळीराम पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने २० आक्टोबर २०२१ रोजी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य कवी महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने यांनी महाकवीच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
या प्रसंगी सर्वप्रथम किनवट शिक्षण संस्था किनवट चे उपाध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार व प्राचार्य एस.के.बेंबरेकर यांनी आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.उपस्थित उप्राचार्य जी.एस.वानखेड़े, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा किनवट पोलीस स्टेशन चे जमादार कल्लाळीकर व पालक प्रतिनिधी नृरसिंहराव तसेच पर्यवेक्षक प्रा .अनिल पाटील,प्रा.राजकुमार नेम्मानीवार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी शेषराव माने, प महिला कार्यक्रमाधिकारी ,प्रा डाँ लता पेंडलवाड , ,प्रा ज्ञानेश्वर चाटे , कार्यालयीन अधिक्षक राजेन्द धात्रक,दीपक खंदारे, सुधीर पाटील,रासेयो स्वयंसेवक समर्थ पाटील किशोर आडे,भाग्यश्री मढावी आदी उपस्थित होते.

Copyright ©