Breaking News यवतमाळ सामाजिक

वेळेवर रुग्नवाहिका न मिळाल्याणे अपघात ग्रस्त योगेशचा गेला जीव

प्रतिनिधी यवतमाळ पुरुषोत्तम कामठे

वेळेवर रुग्नवाहिका न मिळाल्याणे अपघात ग्रस्त योगेशचा गेला जीव
हा आहे.शासकीय महा तथा रुग्नालयाचा जीव घेणा चेहरा

यवतमाळ:येथील पिम्पळगाव परिसरातील रहिवासी दादू उर्फ(योगेश नारायण गावंडे)नामक युवकाचा काल दीनांक 20 ऑक्टोंबर 2021 रोजी 7 वाजताच्या सुमारात सुरभिनगर जवळील वार्को सिटी परिसरात ट्रैक्टर च्या उभ्या ट्रॉली ला धड़कल्याने अपघात झाला माहिती मिळाल्या नुसार ट्रैक्टरची ट्रॉली नगरपरिषदेची होती ट्रॉलिचा टायर पंचर झाल्याने ट्रैक्टर चालकाने ट्रॉली जैक लाउन रसत्यात ऊभी करुण टायर पंचर बनवन्यास गेला होता ट्रॉली ला कुठल्याही प्रकारचे संकेत चिन्ह लावलेले नसल्याने हा अपघात घडला आणि ही ट्रॉली योगेश साठी यमाचे रूप ठरली योगेशचा जीव जान्यामागे जितके नगरपरिषद जवाबदार आहे.त्या पेक्षा जास्त श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ चे रुग्णालय प्रशासन जवाबदार आहे.जख्मी अवस्थेत योगेश ला रुग्णालयात दाखल केल्या नंतर डॉक्टरांनी उपचारा दरम्यान सांगितले की तुमच्या रुग्णाच्या मेंदुला भयंकर मार लागलेला आहे. तथा रुग्णालयात मेंदूवर उपचार करणारे डॉक्टर (न्यूरोसर्जन) उपलब्ध नसल्याने पुढील उपचारास तात्काळ नागपुर महा तथा रुग्नालयात न्यावे लागेल नातेवाइकांनी पुढील उपचारास नागपुर नेंन्याचे ठरवले परंतु नागपुर नेंन्यासाठी कार्डियक एम्बुलेंस ची गरज होती जी शासकीय रुग्नालयात 2 एम्बुलेंस उपलब्ध असतांना रुग्णालय प्रशासनाने दिली नाही ज्या मुळे कार्डियक एम्बुलेंस च्या शोधात 1 तास निघुन गेला अखेर वेळेची कमी असल्याने सामान्य खासगी रुग्नवाहिकेत न्यावे लागले याचा परिणाम अर्ध्यातच योगेश चा जीव गमावला याला अपघात न म्हणता नगररिषद आणि रुग्नालय प्रशासनाने मिळून केलेली हत्या मनायला हरकत नाही गेल्या काही वर्षात आमदार खासदारांनी आपल्या निधितुन शासकीय महा तथा रुग्णालय,यवतमाळ या ठिकाणी कार्डियक व सामान्य रुग्नवाहिका रुहनांच्या सेवेसाठी व रुग्नांचे जीव वाचवन्यासाठि दिल्या परंतु रुग्णालय प्रशासन या रुग्नवाहिकेचा वापर रुग्नांसाठी न करता शोभेच्या वस्तु बनऊंन रुग्णालयात उभ्या ठेवल्या आहे अशा मनमानी कारभाराणी उपचारा अभावी अनेक दादू का प्राणास मुकावे लागले रुग्नांच्या स्वास्थ्या साठी जिल्ह्यातील आमादर,खासदार,तसेच मंत्र्यांनी आणि प्रशासनानी रुग्नालयावर लक्ष देने अत्यंत गरजेचे झाले आहे.नाही तर रोजच एक दादू परिवारा पासून मुकेल

Copyright ©