यवतमाळ सामाजिक

शेतकरी सल्लागार समिती (आत्मा ) अध्यक्ष पदी रामभाऊ मार्शेटवार यांची निवड

संपादक सदानंद जाधव

शेतकरी सल्लागार समिती (आत्मा ) अध्यक्ष पदी रामभाऊ मार्शेटवार यांची निवड

कृषी विभागाच्या विविध विस्तार विषयक योजनेच्या प्रभावी आबलबजावणी करीता आ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा समितीचे गठन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील कृषि क्षेत्रात कार्यरत सर्व स्तरावरी अनुभवी शेतकऱ्यांना संधी देण्यात आली. सदर तालुका स्तरीय शेतकरी सल्लागार समिती (आत्मा) ची सभा आज दिनांक 20/10/2021 रोज बुधवार ला प्रशासकीय इमारत तहसील सभागृह, दिग्रस येथे घेण्यात आली. तालुका कृषी अधिकारी श्री एस. एस. राजपूत यांनी विभागातील योजना बाबत माहिती देऊन आत्मा बाबत मार्गदर्शन केले. यावेळी आत्मा समितीचे सर्व सभासद उपस्थित होते. ह्या मध्ये समितीचे प्रतिनिधत्व करण्याकरिता अध्यक्ष ह्या पदाची नेमणूक सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. सदर सभेला प्रा. प्रेम राठोड, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, तालुका प्रमुख उत्तमराव ठवकर, माजी सभापती मिलिंद मानकर, विनोद जाधव, सुभाषचंद्र अटल, अतिष राठोड, डॉ.विष्णू उकंडे, माजी जि.प. सदस्य दिवाकर राठोड आदी लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आत्मा विषयीचे माहिती देऊन समितीचे कार्य ह्यावर प्रकाशझोत टाकला. मान्यवरांनी कृषी विस्तार कार्यावर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले. सर्व सभासद सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळ कृषि अधिकारी अर्जुन जाधव, चंदण कलोसे प्रामुख्याने उपस्थित होते.
सभा यशस्वी करण्यासाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर बोंडे, कृषी सहायक, कृषि पर्यवेक्षक व समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Copyright ©