यवतमाळ सामाजिक

आई वारली,अन मावशीही हरवली संकल्प फाउंडेशन च्या प्रयत्नाने गवसली

आई वारली,अन मावशीही हरवली
संकल्प फाउंडेशन च्या प्रयत्नाने गवसली

सविस्तर वृत्त असे की,आज सकाळी 10 वाजता वल्लभ नगर ता जिअकोला ह्या 200 की मी हुन प्रभाबाई श्रीकृष्ण सोळंके वय अंदाजे 65 ही महिला आपली बहिणीच्या दशक्रियेसाठी यवतमाळ येथे पोहचली, दर्डा नाका परिसरात बस मधून उतरली दुसऱ्यांदा यवतमाळ इथे ही महिला आली होती,जवळ मोबाईल नाही,पत्ता माहीत नाही,अश्या परिस्थितीत ती हताश होऊन दर्डा नगर परिसरात मदतीच्या प्रयत्नात होती,संकल्प फाउंडेशन चे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार ह्यांच्या नजरेत ही केविलवाणी महिला पडल्यानंतर त्यांनी तिची चौकशी केली असता तिने मृतक बहीण वच्छला दादाराव खानंदे हिच्या दशक्रियेसाठी आल्याचे सांगितले,घरी नवरात्र असल्यामुळे अंत्यविधी साठी येऊ शकली नाही पण दशक्रियेसाठी आली परंतु नातेवाईकांचा पत्ता काही तिला व्यवस्थित सांगता येत नव्हता,खूप ओकसाबोक्सी ती रडत होती,सर्वप्रथम तिला चहा बिस्कीट व पाणी देऊन शांत केले,व संकल्प फाउंडेशन च्या सदस्यांना दर्डा नाका परिसरात बोलाविण्यात आले,किशोर नरांजे,निकेश तिरपुडे, मंगेश वानखडे,रवी माहुरकर,मंगेश पांडे हे घटनास्थळी पोहचले,व काही पत्ता लागतो का ह्या करिता दर्डा नगर परिसरातील खानंदे नावाचे कुटुंब कुठे राहतात ह्याचा शोध घेण्यास सुरुवात केली,कुठलाच धागा किंवा सुगावा नसल्यामुळे 2 तास परिश्रम घेऊनही यश येत नव्हते, मग त्या म्हातारीला प्रत्येक नगराचे नाव ऐकविण्यात आले,संभाजी नगर म्हटल्याबरोबर तिने हलकीशी मान हलविली,लगेच वाघापूर येथील नगरसेवक श्री सुजित राय ह्यांना खानंदे बद्दल चौकशी करण्याची विनंती केली असता त्यांनी तडकाफडकी देविदास खानंदे ह्यांचा शोध घेतला व त्यात त्यांना यश आले,त्यांनी देविदास खानंदे ह्यांच्याशी फोन वर बोलणे करून दिले,परंतु मावशी सोबत संपर्क न झाल्यामुळे,हे कुटुंब नेर तालुक्यातील खानापूर ब्राह्मणवाडा येथे आईच्या दशक्रियेसाठी गेल्याचे कळले,ह्या म्हातारीला पुन्हा अश्रू अनावर झाले,परंतु संकल्प ची टीम इथेच न थांबता तिला नेर च्या बस मध्ये बसवून तिची तिकीट काढून वाहकास विनंती केली की ह्या म्हातारीला नेर येथे उतरविल्यानंतर देविदास खानंदे ह्यांच्याशी संपर्क करून द्यावा,म्हणजे बहिणीच्या दशक्रियेसाठी तिला उपस्थित राहता येईल,बसच्या महिला वाहकाने सुद्धा माणुसकीचा परिचय देत मावशी व मुलाची भेट नेर च्या बसस्थानकामध्ये करून दिली,,संकल्प फाउंडेशन च्या ह्या शोध मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे

Copyright ©