यवतमाळ सामाजिक

जिल्हा स्तरीय सरपंच याची जल जीवन मिशन संदर्भात कार्यशाळा

 

जिल्हा स्तरीय सरपंच याची जल जीवन मिशन संदर्भात कार्यशाळा

जल जीवन मिशन कार्यशाळा NIWCYD, व Water Aid यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले
या जिल्हास्तरिय एकदिवसीय जल जिवन मिशन जनजागृती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदेचे ग्रामिण पाणी पुरवठा विभाग मनोज कुमार चौधर (Dy CEO) तसेच SBM विभागाचे वंदना ढवळे , जिल्हा पाणी गुणवत्ता विभाग. सरोदे व ५ तालुक्यांतील सरपंच राळेगांव, केळापूर, घाटंजी, कळंब, यवतमाळ, वुमन वाटर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक केतन वानखेडे , उप जि, समन्वयक उमेश तांबडे यवतमाळ तालुका समन्वयक सुनील नाईक, कळंब तालुका समन्वयक दिपक तपासे व पाच तालुक्यातील मोबिलाईझर उपस्थित होते. चौधर यांनी जल जिवन मिशन वर मार्गदर्शन करताना स्वच्छ भारत मिशन व जल स्त्रोताची स्वच्छता ठेवणे. हर घर नल नल मे जल या विषयी गावांमध्ये जनजागृती करणे.गावाचे VAP तयार करताना कमित कमी २५-३० वर्षांपेक्षा जास्त काळ हि योजना टिकुन राहावी या उद्देशाने गावाचा अचुक VAP तयार करणे प्रत्तेक कुटुंब, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, शासकिय, कार्यालय यांना योजनेचा लाभ मिळावा व पाणी व्यवस्थापन समितीची जबाबदारी यावर विशेष मोलाचे मार्गदर्शन केले नंतर वंदना ढवळे यांनी स्वच्छ भारत मिशन. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, गाव १०० % हागणदरी मुक्त,१००% शौषखड्डे तयार करणे. १५ वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन, नरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. त्या नंतर जिल्हा पाणी गुणवत्ता विभाग सरोदे यांनी जल जिवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता कशी असावी. पाणी गुणवत्ता तपासणी अहवाल प्रत्तेक पाणी पुरवठा समिती व गावकऱ्यांना याची माहिती असावी पाणी गुणवत्तेचे येलो कार्ड ग्रिन कार्ड रेड कार्ड विषयी मार्गदर्शन केले. ब्लिचींग पावडर तपासणी करणे, गाव हागणदारीमुक्त करणे केतन वानखेडे सर‌ यांनी महिला आणि पाणी प्रटल्पाची संरचना, रुपरेषा VAP, FTK पाणी पुरवठा समितीची भुमिका व जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.शेवटी राजु नगराळे सर यांनी आभार प्रदर्शन केले

Copyright ©