यवतमाळ सामाजिक

शिवभक्त, शिवसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या किंवा मला अटक करा -खासदार हेमंत पाटील यांची आक्रमक भूमिका !

किनवट प्रतिनिधी ( राज माहुरकर)

शिवभक्त, शिवसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या किंवा मला अटक करा -खासदार हेमंत पाटील यांची आक्रमक भूमिका !

हिंगोली : वसमत येथे १३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रित्यार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकी मध्ये सहभागी झालेल्या शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शिवभक्तांवर वसमत पोलिसांनी गुन्हे दाखल केले . याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन शिवभक्तांवर ,शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या, किंवा मला अटक करा अश्या कडक शब्दात पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आणि थेट हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटसमोर धरणे आंदोलन करून तात्काळ गुन्हे मागे न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला .
मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळा वसमत येथे १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात आणण्यात आला . यावेळी वसमत तालुका आणि तमाम हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते . परंतु वसमत पोलिसांनी दंडेलशाही करत मिरवणुकीमध्ये सहभागी झालेलया सर्वच शिवसेना लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि शिवभक्तांवर खोटे गुन्हे दाखल केल्याची वार्ता संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रभर पसरताचा खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्यावर जर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही खुशाल जेलमध्ये जायला तयार होत आहोत . परंतु चुकीच्या पद्धतीने दाखल होणारे गुन्हे कदापी खपवून घेतले जाणार नाहीत अश्या कडक शब्दात इशारा देऊन खासदार हेमंत पाटील , आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन केले . शिवभक्तांवर ,शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, किंवा मला अटक करा अशी गर्जना करून जिल्हा पोलीस प्रशासनाचा निषेध केला.
यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्या सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर, सहसंपर्कप्रमुख डॉ रमेश शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, उपजिल्हाप्रमुख सुनिल भाऊ काळे, परमेश्वर मांडगे, उध्दवराव गायकवाड, संदेश देशमुख, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, आनंदराव जगताप, अंकुश आहेर, राजु चापके, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, रमेश दळवी, जि.प.सभापती फकीरा मुंडे, जि.प. सदस्य विठ्ठल चौतमाल, बाळासाहेब मगर, नंदकिशोर खिलारे, नगरसेवक सुभाष बांगर, राजेश इंगोले, प्रल्हाद राखोंडे, ईश्वर तांबोळी, संभाजीराव बेले, काशिनाथ भोसले, बाबा आफुने, राजु पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, दतराव लोंढे, भाई कराळे, रवी नादरे, संतोष शेळके, जसवंत काळे, धीरज कुलथे, ज्ञानेश्वर बांगर, रामप्रसाद हरबळे, व्यंकटी कऱ्हाळे, प्रमोद भुसारे, ज्ञानेश्वर भालेराव, हनुमान चव्हाण, चंदू शिंदे, ज्ञानेश्वर कदम, ज्ञानेश्वर हरबळे, पप्पू कदम, हनुमान बांगर यांच्यासह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©