यवतमाळ सामाजिक

अनं सावित्रीच्या लेकींच्या चेह-यावर हास्य फुलले

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

अनं सावित्रीच्या लेकींच्या चेह-यावर हास्य फुलले

घाटंजी :- स्थानिक एस.पी.एम विद्यालयात मानवविकास मिशन अंतर्गत २२ विध्यार्थीनींना सायकल वाटपचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी दिपीका गुल्हाने, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य रामकृष्ण कोडापे, पर्यवेक्षक फिरोज पठान, मनोज बुरांडे, संदीप गोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल चे वाटप करण्यात आले.अनं सावित्रीच्या लेकींच्या चेह-यावर हास्य फुलले. कार्यक्रमाचे संचालन अनुप मानकर , प्रास्ताविक प्रशांत उगले तर आभार चारुशीला पंधरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालीनी मेश्राम , ज्ञानेश्वर मस्के, महेश वाघाडे, विनोद ठाकरे, संदीप नखाते, प्रफुल्ला गुल्हाने, गजानन उत्तरवार, गजानन इंगोले यांंनी सहकार्य केले.

Copyright ©