यवतमाळ सामाजिक

आर्णी प. स. मधे पार पडला जागतिक हॅन्ड वॉश डे

आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम

आर्णी प. स. मधे पार पडला जागतिक हॅन्ड वॉश डे

ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात हात धुण्यासाठी नागरीकांन मधे जागृती करण्याची गरज

आर्णी:- दिनांक १५ आक्टोबर हा दिवस जागतिक हॅन्ड वॉश डे म्हणून संपुर्ण जगात साजरा करण्यात योतो. त्यामुळे आर्णी पंचायत समिती अंर्तगत येत असलेल्या स्वच्छ भारत मिशन यांच्या विद्यमानाने पंचायत समितीच्या आवारात आर्णी येथिल गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा जागतीक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला यावेळी स्वच्छ भारत मिशनचे आर्णी चे समन्वय सुमित डकरे यांनी पंचायत समितीच्या कार्यालयातील कर्मचारी यांना मार्गदर्शन केले हाताची स्वच्छता राखल्यामुळे काय फायदा होतो याबाबत सविस्तर माहिती दिली त्यानतंर कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी आपले हात धुऊन हा दिवस साजरा केला यावेळी गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, पंचायत समिती सदस्य,अनुप जाधव, कक्ष अधिकारी, विकास गुल्हाने, कृषी विस्तार अधिकारी, सुरेश चांगोले,पंचायत समितीचे शाखा, अभियंता सुनिल वेरुळकर, वसंत भोकरे,कनिष्ठ लेखाधिकारी गेडाम, पंचायत विस्तार अधिकारी, प्रफुल ठेंगेकर, इंगोले, चोपडे, आरोग्य विस्तार अधिकारी चंद्रकांत पांचोरे अधिक्षक, प्रमोद माकोडे, शिक्षण पर्वक्षक परमार सर, लिपीक प्रमोद मांडवकर, मनिष चौधरी, झळके, मनरेगाचे दादाराव खिल्लारे, महेश देवतळे, माने मॅडम, चौधरी मॅडम शिपाई विंचूरकर, नेहारेबाई इत्यादींनी आपले हात स्वच्छ करुन जागतीक हात धुवा दिवस साजरा केला

Copyright ©