यवतमाळ सामाजिक

बोर्खेडी येतिल शेत शिवारात जाणारा मुख्य रस्ता,बोर्खेडी धरणाच्या ओहर फ्लो च्या पुराच्या पाण्यानी गेला वाहुन


आकोली प्रतिनिधी सचिन चावरे

बोर्खेडी येतिल शेत शिवारात जाणारा मुख्य रस्ता,बोर्खेडी धरणाच्या ओहर फ्लो च्या पुराच्या पाण्यानी गेला वाहुन

शाषन दरबारी शेतकर्यानचे साकडे मात्र अजुन्पर्यंत दखल घेण्यात आली नाही

तालुक्याला लागुन असलेल्या आर्वि तालुक्यातील शेवटच्या टोकावर जंगल व्याप्त परिसरात वसलेले बोर्खेडी गाव आहे.गेल्या महिना-दोन महिन्याभर्या पासुन संतधार पाऊस सुरु होता त्यामूळे बोर्खेडी धरन भरुन ओहर फ्लो सुरु झाला त्याच ओहर फ्लो च्या नदीवरती बोर्खेडी येथील सर्व शेतकर्यानचा शेत शिवारात जाण्याचा मुख्य रस्ता आहे. शेतकर्याना त्या रस्त्यानी अवागमन कराव लागते.मात्र गेल्या दिड महिन्या आधी ओहर फ्लो च्या पुराच्या पाण्यानी कच्चा पूल खरडून वाहुन गेला असुन त्या रस्त्यावरुन सतत माणुस भर पानी वाहत आहे बैल बंडी तर नाहीच साध माणुस रस्त्यानी जान शक्य होत नाही.बोर्खेडी येतिल सर्व शेतकर्यानचा शेतात जाण्याचा मूख्य रस्ता असुन पर्यायी दुसरा रस्ता नाहीच. या सर्व बाबीन विषई जिल्हा अधिकारी वर्धा,तहसीलदार आर्वि तसेच लघू सिंचन पाठ बंधारेविभाग आर्वि यांना निवेदन देऊन महिना लोटला असुन शेतकरी नियमित शाषन दरबारी साकडे घालत आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे दखल घेन्यात आलेली नसुन शेतकर्याना मोट्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.व प्रशासनाप्रती बोर्खेडी येतिल शेतकर्यानकडून रोष व्यक्त होत आहे आमच्या रस्त्यावरती पूल होइल तरी कधी असा मोठा प्रष्न बोर्खेडी येतिल शेतकर्याना पडला असुन आमच्या रस्त्यावरील पूल होइल तरी कधी असा प्रश्ण बोर्खेडी येथील शेतकरी शाषनाला विचारत आहे.
जंगल व्याप्त परिसर असल्यानी अम्हाला रात्री बे रात्री जागल करण्यासाठी शेतात जाव लागत. जिव मुठीत घेऊन कम्भरी येवड्या पाण्यातून वाट काढावी लागते. कच्चा पूल वाहुन गेला दिड-दोन महिने लोटून गेले ,रस्त्याला डोहाचे स्वरुप आले मात्र प्रशाशनानी अद्याप कुठलीही मदत केलेली नाही.
शेतकरी वर्ग बोर्खेडी.

Copyright ©