यवतमाळ सामाजिक

मुख्यकार्यकारीअधिकारी यांची हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहणी

मुख्यसंपादक ओंकार चेके सर

मुख्यकार्यकारीअधिकारी यांची हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहणी

येथील सतत चर्चेत असणाऱ्या हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दुपारी 2 वाजताच्या दरम्यान मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, व जिल्हा आरोग्य अधिकारी चव्हाण यांनी कोविड लसीकरण संदर्भात भेट दिली यावेळी अनुपस्थित कर्मचारी ,स्वच्छता,वॉर्डातील सुविधा या बाबत सूचना देण्यात आल्या तर लासिकर्णावर जास्तीजास्त भर देण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना देऊन आता पर्यंत झालेल्या लाभार्थ्यांची माहिती घेतली तर गावातील ग्रामसेवक,पंचायत समिती सदस्य,सरपंच यांनी गावातील लाभार्थ्यांना जागरूक करण्यात सतत काम करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाक्रस यांनी दिले,तर रुग्णालयात चतुर्थ कर्माच्यार्याच्या नियुक्त्या नसल्याने अनेक कामे प्रलंबित रहात असल्याचे अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले या वेळी
मुख्यकार्यकारीअधिकारी श्रीकृष्ण पांचाळ,जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण,गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाक्रस,विस्तार अधिकारी अनिल जगताप, डॉ.अतुल राऊत,ग्रामसेवक बी. एन.ठाकरे,सुभाष मडावी सिधार्थ भगत व आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©