यवतमाळ सामाजिक

घाटंजी बसस्थानक परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

घाटंजी बसस्थानक परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
——————————————–
युवा परोगामी विचारमंचचा पुढाकार 
——————————————–
घाटंजी- दिनांक १५ ऑक्टोंबर शुक्रवारला स्थानिक बसस्थानक परिसरात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.१४ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शेकडो अनूयायी सह बौद्ध धम्म ची दीक्षा दिली त्यामुळे हा दिवस विजयादशमीचा होता राजा सम्राट अशोकाने ह्याच दिवशी विजय मिळविला होता व धम्माचा मार्ग अवलंबिला याच दिवसाचे औचित्य साधून युवा पुरोगामी विचारमंच मार्फ़त धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे आयोजन युवा पुरोगामी विचारमंच चे भाविक भगत यांनी केलं होते.प्रथमतः बसस्थानक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिपबत्ती प्रज्वलित करून बाबासाहेबांच्या व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या जयघोष करत सदर कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष जीवने तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकाश वावरे,गजानन देवतळे होते. मान्यवरानी बाबासाहेबांच्या विचारावर प्रकाश टाकला व पुष्प अर्पण केले. त्यावेळी प्रामुख्याने गजानन देवतळे,होमदेव किनाके,वाहतूक नियंत्रक एस.पी.वाकोडे,सुनील नगराळे,जितेंद्र मुनेश्वर,अजय गजभिये,उमेश घरडे,शेषराव नगराळे,प्रफुल राऊत,संजय घुसे, सिद्धांत जीवने,गजानन ठाकरे, आदी पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन भाविक भगत यांनी तर आभार सिद्धांत जीवने यांनी मानले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©