यवतमाळ सामाजिक

पटीयाला ( पंजाब) येथुन NIS बॉक्सिंग राष्ट्रीय दर्जाचा कोर्स पूर्ण करून आल्या बद्दल संदीप यशीमोड यांचे उपविभागिय अधिकारी पुजार यांनी केला सत्कार

किनवट प्रतिनिधी (राज माहुरकर)

पटीयाला ( पंजाब) येथुन NIS बॉक्सिंग राष्ट्रीय दर्जाचा कोर्स पूर्ण करून आल्या बद्दल संदीप यशीमोड यांचे उपविभागिय अधिकारी पुजार यांनी केला सत्कार

क्रिडा संयोजक तथा कराटे प्रशिक्षक संदीप यशीमोड यांनी आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले व किनवट तालुक्यात एक आदर्श निर्माण केला त्यांच्या मुळे अनेक विद्यार्थी क्रिडा क्षेत्राकडे आकर्षित झाले त्यामध्ये आणखी एक मानाचा तुरा त्यांनी रोवला पटीयाला पंजाब जिथे अनेक राष्ट्रीय क्रिडापटु प्रशिक्षण घेतात व सुर्वण पदक मिळवून भारताच नाव लौकिक करतात अशा ठिकाणी यशीमोड यांनी जाऊन NIS कोर्स पूर्ण केला त्यामुळे आता किनवट सारख्या आदिवासी अतीदुर्गम भागास कराटे सोबतच बॉक्सिंग क्रिडा प्रकार राष्ट्रीय दर्जाच प्रशिक्षण मिळणार आहे हि एक किनवट तालुक्यासाठी गर्वाची बाब आहे.
त्यांनी NIS कोर्स पूर्ण केल्या बद्दल सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागिय अधिकारी किर्ती किरण पुजार IAS हस्ते त्यांच पुष्पगुच्छ , प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आल या वेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कराड , गणराज गायकवाड, सोनटक्के सर, राहुल अपसमवाड, फरहान सर, देशमुखे मॅडम, शिंदे सर, परीवाले सर, नरवाडे सर, तथा किनवट शासकिम आश्रम शाळेचे अधिक्षक पुरी सर, व सर्व क्रिडा शिक्षक या वेळी उपस्थित होते.

Copyright ©