यवतमाळ सामाजिक

गावातील चुकीच्या राजकारणाने वाकी येथिल घरकुल लाभार्थी त्रस्त

गावातील चुकीच्या राजकारणाने वाकी येथिल घरकुल लाभार्थी त्रस्त
———————————————-
यवतमाळ- तालुक्यातील वाकी तळेगाव येथिल गरिबीच्या सावटाखाली जिवन जगणारे वयोवृध्द वसंतराव शामराव वानखडे यांचे २००२ मधील सर्वेक्षणानुसार प्रतिक्षा यादीत नाव असताना सुध्दा गावातील क्रूरतेच्या राजकारणाने त्यांना त्यांच्या हक्काच्या घरकुल लाभापासून वंचित ठेवले. त्यानंतर वानखडे यांच्या अथक प्रयत्नाने सन २०१५-२०१६ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करण्यात आले. आणि पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला मात्र गावातील कुटील नितीच्या राजकारणाने पुढील हप्ते थांबविण्यात आल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत.
वसंतराव शामराव वानखडे हे वाकी ता. यवतमाळ येथीलच रहिवासी असून त्यांचा जन्म सुध्दा याच गावात झाला आहे आणि ते या गावातील बिपीएल यादीत जन्मापासून कायम आहे. आणि त्यांचे जवळ मालमत्ता नंबर १२२ क्षेत्रफळ २८ बाय २६ म्हणजे ७२८ चौरस स्वतःची जागा आहे. एवढे सर्व असताना सुध्दा त्यांचा मुलगा सचिन वसंतराव वानखडे गावातील निवडणूक लढवितो त्यांनी ही निवडणूक लढवू नये याचा वचपा काढण्यासाठी सत्ताधारी गट आपल्या ताकदीचा चुकीच्या मार्गाने वापर करून अतिक्रण ची जागा दाखवून घरकुल चे पुढील हप्ते मिळू नये यासाठी वरीष्ठ अधिकारी यांचे कडे तक्रारी देवून वयोवृध्द वानखडे यांचे घरकुल मध्येच थांबविण्याचा प्रकार घडला आहे. यात आपण वारंवार पंचायत समितीस कळविले आहे. यात अधिकारी वर्गापासून तर संबंधित कर्मचारी उलट त्यांनाच सहकार्य करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे माझे घरकुल टीन लेव्हलला आले तरी पुढील हप्ते अदा का करण्यात आले नाही हे एक न उलगडणारे कोडेच आहे. यात नक्कीच संगनमत करून माझे हप्ते उचल करून हडप करण्याचा प्रयत्न दिसून येत असल्याचा गंभीर आरोप सचिन वानखडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.

Copyright ©