Breaking News महाराष्ट्र सामाजिक

शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला लावली आग. सुमारे दोन लाखाचं सोयाबीन जळून झाले खाक.

माहूर प्रतिनिधी पद्मा गिऱ्हे 

शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला लावली आग. सुमारे दोन लाखाचं सोयाबीन जळून झाले खाक.

माहूर तालुक्यातील हिंगणी येथील शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात भामट्याने आग लावल्याने सुमारे दोन लक्ष रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद अविनाश गोविंदराव हुलकाने यांनी दि.14 ऑक्टो. रोजी माहूर तहसीलदार व पोलीस स्टेशनला दिली आहे.
शेतकरी अविनाश हुलकाने यांनी दि. 13 रोजी दिवसभर मजूर लावून सोयाबीन कापून शेतात गंजी लावली होती.दि 14 रोजी मळनियंत्र सुद्धा बोलावले होते. परंतु रात्री गावात कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने त्यांनी गंजी तशीच झाकून रात्री 10 वा. ते गावात गेले. रात्री 12 वा. कीर्तन थांबल्याने सभामंडपातून बाहेर आले असता त्यांना शेतातून धूर निघतांना दिसला. लागलीच ती बाब त्यांनी गावकऱ्यांना सांगितली आणि शेताकडे धाव घेऊन सोयाबीनच्या गंजीला लागलेली आग विझावण्याचा प्रयत्न केला, मात्र आग काही आटोक्यात आली नाही. परिणामी 25 ते 30 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले.
सदर घटनेची फिर्याद त्यांनी माहूर ला येऊन माहूर तहसीलदार राकेश गिड्डे व पो. नि.नामदेव रिठे यांना देऊन घटनेची चौकशी करून शासकीय मदतीची मागणी केली आहे.
आज पर्यंत इलियास बावाणी ,इम्रान नवाब व बुड्डा भोई या शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजीला आग लावून प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. हा प्रकार नित्याचाच झाल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हकीकत कथन करून चौकशी पथक नेमण्याची विनंती करणार असल्याची माहिती गावक-यांनी दिली.

Copyright ©