महाराष्ट्र सामाजिक

नवरात्रीनिमित्त समाजसेवक गजानन हरणे यांचा नऊ दिवस विविध कायद्यांचा जागर

जिल्हा प्रतिनिधी

नवरात्रीनिमित्त समाजसेवक गजानन हरणे यांचा नऊ दिवस विविध कायद्यांचा जागर

निर्भय बनो जनआंदोलन, सेवाश्री बहुद्देशीय संस्था, विविध दुर्गा उत्सव मंडळ,नेहरू युवा मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर नवरात्रीनिमित्त नऊ दिवस जागर कायद्यांचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात विविध गावांमध्ये समाजसेवक गजानन हरणे यांच्या प्रवचना द्वारे, उत्साहात पार पडला. नवरात्र उत्सव म्हटले की धार्मिक कार्यक्रम एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता या उत्सवाचा जनसामान्य लोकांना फायदा व्हावा म्हणून शासनाने केलेल्या विविध योजना, व जनहिताच्या अनेक कायदे सर्वसामान्य गोरगरीब, शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजसेवक गजानन हरणे यांनी हा उपक्रम जिल्हाभर राबवला आहे. त्यामध्ये माहितीचा अधिकार, पंचायत राज ग्रामसभा, दारूबंदी चा कायदा, रेशनिंग,गॅस संबंधित कायदा, दप्तर दिरंगाईचा कायदा, सेवा अधिनियम, ग्राहकाचा कायदा,शेतकऱ्या संबंधित विविध कायदे, महिला संबंधित विविध कायदे, बेरोजगार युवकांसाठी च्या विविध योजना, आदी अनेक योजनेबाबत व कायद्याबाबत जनजागृतीचे कार्यक्रम या नवरात्री निमित्त राबवून नऊ दिवस विविध कायद्यांचा जागर गावागावांमध्ये समाजसेवक गजानन हरणे यांनी आपल्या प्रवचना द्वारे केला. तसेच गजानन हरणे यांनी प्रकाशित केलेल्या विविध कायद्याचे पुस्तकाचे मोफत वितरण लोकांना करण्यात आले. यामध्ये विविध गावच्या दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, निर्भय बनो जनआंदोलन कार्यकर्त्यांनी, नेहरू युवा मंडळ, विविध गावचे सरपंच व उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी मोलाचे योगदान कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन साठी दिले आहे. त्यामध्ये देऊळगाव, पिंजर, सावरगाव, आडगाव, बोरगाव, बोरटा, कान्हेरी, वरुड, सुलतानपूर आदी गावांमध्ये नवरात्रीचे जागरण कार्यक्रम करण्यात आला त्या, त्या गावच्या मंडळांनी हा कायद्याचा जागर जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला लोकांची प्रचंड गर्दी होऊन या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी युवकांनी महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. कार्यक्रमाचा शेवटी लोकांच्या प्रश्न उत्तरने कार्यक्रमाची सांगता होत होती .

Copyright ©