यवतमाळ सामाजिक

घरगुती महत्वाच्या वस्तू दुरुस्तीसाठी घेऊन जातोय ,अन भंगार मध्ये विकून खातोय 

संपादक सदानंद जाधव

घरगुती महत्वाच्या वस्तू दुरुस्तीसाठी घेऊन जातोय ,अन भंगार मध्ये विकून खातोय 

गृहिणीनो  सावधान मिक्सर कुकर दुरुस्ती च्या नावाने एक  फेरीवाला करतोय  फसवणूक 

वन विभाग कार्यालय परिसराच्या बाजूला वास्तव्यास असणारा तो बर्तन-भांडे व्यवसायाच्या नावाने घरगुती वस्तू लंपास करणारा चोरट्या कोण.सायकलवर मोजके भांडे ठेऊन भांडे व्यवसाय करीत असल्याचे भासवून मिक्सर कुकर दुरुस्ती करून देतो म्हणून घेऊन जातो व काही महिने अदृश्य होतो.त्या लुबाडू व्यक्तीला महिलांनि  दुरुस्तीसाठी दिलेल्या वस्तू बद्धल विचारणा केल्यास तो लुबाडू उलट त्या महिलांना दमदाटी करीत असल्याचे कळतय.मेरेको एक काम है क्या तुम्हारा कुकर मिक्सर बेच थोडी खाया अगले टाईम आऊगा तो लेके आता अशी उलट दम दाटी करून फसवणूक करीत आहे.या व्यक्तीने अनेक लोकांच्या वस्तू नेऊन भंगारात विकल्याचे बोलल्या जाय आहे .शहरात असंख्य नावाजलेले भांडे विक्रेते व घरगुती वस्तू दुरुस्त करणारे असतांना त्यांच्या कडे वस्तू दुरुस्तीसाठी न पाठवता.शहरात गल्लोगल्ली फिरून फसवणू करणाऱ्या  लुटारू भामट्याना वस्तू सह आधीच दुरुस्तीचे पैसे देऊन गृहिणीची फसवणूक झाल्याचे कळत आहे.बरत्न-भांड्याच्या व्यवसाया चा सहारा घेऊन घरगुती वस्तू दुरुस्ती च्या नावाने वस्तू घेऊन लंपास होणाऱ्या व्यक्तीचा पोलीस प्रशासन तपास लावतील का या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे

Copyright ©