महाराष्ट्र सामाजिक

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

आजनसरा डॉ संदीप लोंढे

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

क्रांती घडवावी तर बाबासाहेबांसारखी आणि शांती मिळावी तर गौतम बुद्धांसारखी संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी जीवन वाहून घेणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी लक्षावधी अनुयांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता,आज आपण सर्व स्वाभिमानाने जीवन जगतो याचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून आजचा दिवस हा त्यांच्या कार्याला उजाळा देणारा आहे,ज्ञानाचा अथांग सागर असलेल्या या महामानवाचा बौद्ध धर्म स्वीकारल्या नंतर अवघ्या दीड महिन्यातच 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले ,दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले होते,हे दोन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे असून बहुजन समाजातील सर्वांना बाबासाहेबांच्या कार्याची आठवण जागृत झाल्या शिवाय राहत नाही,आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 65 व्या वर्धापन दिनाचा सोहळा हिंगणघाट चे बसस्थानक आगारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाचे उदघाटक कार्यशाळा सहाय्यक खडतकर तर अध्यक्ष म्हणून आगर प्रमुख मसराम,तर प्रमुख पाहुणे डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे माजी प्राचार्य भगत सर ,सामाजिक कार्यकर्ते ऍड थूल,राजू नगराळे यांची उपस्थिती होती,कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले,जय शिवराय ,जय भिमराय चा जयघोष करण्यात आला,यावेळी आगारातील कर्मचारी ,प्रवासी व इतर मान्यवर मिळून सामूहिक बुध्द वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्र संचालन एस टी वाहक गंगाधर थूल यांनी तर आभार प्रदर्शन स्मिता कांबळे यांनी मानले,कार्यक्रमानंतर उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आली.

Copyright ©