यवतमाळ सामाजिक

विश्वजित कपिलेची भोंदुगिरी झाली उघड. माहूर पोलीसांनी केला चौघावर गुन्हे दाखल.

माहूर प्रतिनिधी पद्मा गि-हे

विश्वजित कपिलेची भोंदुगिरी झाली उघड. माहूर पोलीसांनी केला चौघावर गुन्हे दाखल.

डोंबवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर (39 वर्षे ) यांस 24 लाख रुपयाचा गंडा घातल्या प्रकरणी त्यांचे फिर्यादी वरून माहूर पोलीसांनी दि.13 ऑक्टो.रोजी रात्री 11-46 वा. विश्वजित रामचंद्र कपिले या भोंदुबाबासह रवि रामचंद्र कपिले,कैलाश रामचंद्र कपिले व सारिका रवि कपिले यांचेवर कलम 420,328,506,34 व महाराष्ट्र नरबळी तसेच ईतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रतिबंध कायदा नियम 2013 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले असून महीला आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी असलेला कपिले महाराज काही वर्षांपूर्वी माहुर नगरीत आला.पुढे तो नियमितपणे श्रीदत्त शिखरावर येत असे .त्यामुळे श्रीदत्त शिखर संस्थानने मातृतीर्थ तलाव परिसरात त्याला काही जागा उपलब्ध करून दिली होती.डोंबवलीच्या प्रवीण शेरकर यांना आजार जडल्यामुळे त्यांनी प्रथम मुंबईच्या वेगवेगळ्या दवाखान्यात इलाज केला.त्यामुळे तब्बेतीत थोडीबहुत सुधारणा झाली. त्यानंतर भालेराव या व्यक्तीच्या माध्यमांतून त्यांची ओळख बाबाशी झाली. प्रवीणने आपल्या प्रकृतिबाबतची हकीकत सांगितल्यावर बाबांनी तुझ्यावर उपचार करण्यासाठी साधना करावी लागेल असे सांगून सन 2013 ते 2020 पर्यंत त्यांच्या कडून एक चारचाकी वाहन,कॅमेरा व भ्रमणध्वनीसह तब्बल 24 लाख रुपया पर्यंत रक्कम उकळली,मात्र प्रकृतिला काही आराम नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर आपण फिर्याद दाखल केल्याचे प्रवीणने पोलीसांना दिलेल्या जबानीतून सांगितले. फिर्यादी सोबत त्याने अघोरी कृत्य करीत असल्या वेळचे चित्रीकरण केलेली चित्रफीत व वेळोवेळी बँक खात्यातून बाबाला पैसे पाठविल्याचे पुरावे पोलीसांना सुपूर्द केले. कपिले बाबाला गुप्त धनाची लालसा असून तो त्याकरीता अघोरी कृत्य करीत असल्याचे लक्षात येताच श्रीदत्तशिखर संस्थानच्या सेवेक-यांनी काही महीन्यापूर्वी एके रात्री त्याला तिथून हूसकावून लावले होते.कपिले बाबावर नागपूर येथे दि.26/3/2018 रोजी विविध कलमानुसार फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.हे विशेष.

स.पो.नि.अण्णासाहेब पवार,बिट जमादार विजय आडे,प्रकाश देशमुख व परमेश्वर कनकावार यांच्या पथकाने सायबर सेल नांदेडची मदत घेवून टॉवर लोकेशनच्या आधारे 5 तास दबा धरून आरोपीला ताब्यात घेतले.याकामी स.पो.नि.संजय पवार यांची विशेष मदत मिळाल्याची माहीती .पो.नि.नामदेव रिठ्ठे यांनी दिली.

Copyright ©