यवतमाळ सामाजिक

नवरात्रोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चीचघाट ने विविध  उपक्रम राबविले

नवरात्रोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चीचघाट ने विविध  उपक्रम राबविले

यवतमाळ: पंचायत समिती यवतमाळ अंतर्गत येणाऱ्या तळेगाव केंद्र चीचघाट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांथिनीं विविध वेशभूषा परिधान केल्याने आधुनिक दुर्गा अवतरल्याचा साक्षात दिसून आला.
नवरात्रोत्सव काळात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चीचघाट ने विविध प्रकारचे उपक्रम राबविले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ,राजमाता अहिल्याबाई होळकर ,त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हुबेहुब भूमिकेत इयत्ता पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी दिव्यानी पवार,रिया उमरे, जयश्री हगवणे, अक्षरा राठोड, रिया दुधे, या पहावयास मिळाल्या त्यामुळे जि.प .शाळा चीचघाट येथे आधुनिक दुर्गा अवतरल्याचा प्रत्येय पहावयास मिळाला.
शाळेच्या इयत्ता पाचवीच्या वर्ग शिक्षिका माया हलवले यांनी दुर्गा उत्सवात राबविलेला हा उपक्रम प्रशंसनिय ठरला आहे.

Copyright ©