यवतमाळ सामाजिक

पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने वाचला महिलेचा चा जीव

संपादक सदानंद जाधव

पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने वाचला महिलेचा चा जीव

मलिकार्जुन मंदिर जवळील कठडा नसलेल्या पुलावरून मुंगसाबाई जात असताना तोल जाऊन पुलावरून पडल्या

आज दुपारी अंदाजे १:३० च्या दरम्यान मुंगसाबाई कड ह्या पूल ओलांडत असतांना अचानक तोल जाऊन पुलावरून खाली पाण्यात पडल्या. हे दृश्य पाहताच तेथे उपस्थित असलेल्या राजेश लाखकर यांनी तात्काळ जवळ असलेल्या नागरिकांच्या मदतीने नदीत पडलेल्या महिलेला बाहेर काढले. महिलेला बाहेर काढुन आस्थेने विचारपूस केली.ती महिला पाण्यात बीजल्या मुळे काकडत होती म्हणून काळकर यांच्या घरून चहा बोलावून स्वतः बशीने त्या महिलेला चहा पाजली व महिलेच्या नातेवाईकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून बोलावून घेतले व त्या महिलेला ऑटोमध्ये बसवून नातेवाईकांन सह घरी पाठवले. यावरून पोलिसांची असलेली तत्परता आणि नागरिकांप्रती असलेली आस्था दिसून आली. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात असून नातेवाईकांनी पोलीस कर्मचारी राजेश लाखकर यांचे आभार व्यक्त केले. पोलीस कर्मचाऱ्याच्या तत्परतेने अनर्थ टळला मात्र त्या पुलाला कठडे असते तर ती महिला पडलीच नसती अश्या प्रतिकीर्या नागरिकांतून येत आहे.त्या पुलाला दोन्ही बाजूनी कठडे लावण्याची नागरिकातून मागणी होत आहे

Copyright ©