यवतमाळ सामाजिक

माहूर येथील रामगड किल्यातील महाकाली मंदीरात उत्साहात घटस्थापना संपन्न.

माहूर प्रतिनिधी पदमा गि-हे

माहूर येथील रामगड किल्यातील महाकाली मंदीरात उत्साहात घटस्थापना संपन्न.

महाराष्ट्रातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र माहूरगड येथे ऐतिहासिक रामगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्यावर दर्शनीभागावर असलेल्या बूरूजात महाकाली मंदीरात दिनांक 6 आॅक्टोबर 2021 रोजी पुजारी योगेश जोशी यांच्या हस्ते घटस्थापना उत्साहात संपन्न झाली. महाकाली देवीचे प्राचिन मंदीर असून अनादी काळापासून महाकालीचे पुजारी योगेश रमेश जोशी हे वंश परंपरेनुसार नित्यनेमाने महाकाली मातेची दैनंदिन पूजा,अभिषेक,नैवेद्य आरतीसह येणारे सण उत्सव साजरे करीत असतांना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते सदर ठिकाणी दर दिवशी शेकडो भाविक नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येत असतात परंतू भाविकांसाठी कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध नसून गडावर जाण्यासाठी असलेल्या दर्शन मार्ग हा अतिशय अवघड अरूंद असून लाईटची सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांना जिव मुठीत धरून दर्शनासाठी जावे लागते थोडा जरी तोल गेला तर भाविकावर रामनाम सत्य है हे स्विकारण्याशिवाय गत्यंतर नाही सदरचा किल्ला हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने नुकताच या किल्याच्या डागडूगी व दूरुस्तीवर करोडो रुपये खर्च करून थातूरमातूर काम करण्यात येवून आओ चोरो बांधो भार आधा तेरा आधा हमारा या म्हणीप्रमाणे या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याबाबत सूज्ञ नागरिकांनी संबधीत विभागाकडे तक्रारी देखील केल्या परंतू संबधीत विभागाने त्याकडे भ्रष्टाचाराला पाठीशी घालत जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले, विशेष म्हणजे माहूर परिसरात पुरातत्व विभागाचे डझनावारी संरक्षीत स्मारके असून या स्मारकाची देखभाल करण्यासाठी संबंधित व
विभागाचा एकही कर्मचारी नसल्याने संरक्षीत स्मारकाची सुरक्षा रामभरोसे असल्याने मागील काळात पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या मात्रूतिर्थ तलावात औरंगाबाद येथील चार भाविकांना आपले प्राण गमवावे लागले तर महाकालीच्या बूरूजावरुन तोल गेल्याने अमरावती येथील तरुणीला प्राणास मुकावे लागले होते परंतू कूंभकर्णी झोपेत असलेल्या पुरातत्त्व खात्याला लाज वा खंत वाटत नाही ही खेदाची बाब आहे.
प्रत्येकयात्रेच्या पूर्वसंधेला होणार्‍या यात्रानियोजन बैठकीत स्थानिकांकडून सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला जातो परंतु याबाबत बूढी सच कहती सूनता कौन या म्हणीप्रमाणे या गंभीर बाबीकडे प्रशासन जाणीव पूर्वक दूर्लक्ष करीत आहे याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे .महाकाली मातेची बहीण असलेल्या श्रीरेणूकादेवी संस्थानने तरी महाकाली मंदिराकडे जाणार्‍या दर्शनमार्गाची दुरूस्ती करावी अशीभाविक भक्तांनी अपेक्षा आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली आहे.

Copyright ©