यवतमाळ सामाजिक

खासदार निधीच्या मोवाडा येथिल मंदिराच्या बांधकामात अफरातफर

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

खासदार निधीच्या मोवाडा येथिल मंदिराच्या बांधकामात
अफरातफर
——————————————-
माजी सरपंच गिरिधर राठोड यांचा आरोप
——————————————–
घाटंजी- तालुक्यातील मोवाडा येथे मंदिराच्या बांधकामासाठी तत्कालीन खासदार हंसराज अहिर यांच्या निधीतून पाच लक्ष रुपयाचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते. यात प्रथम लोकसहभागातून काही बांधकाम करण्यात आले होते. यात खासदार निधीची मंजूरात आल्यावर ते काम एका कंत्राटदाराला देण्यात आले मात्र येथे जुने बांधकाम असल्याचे भासवून शाखा अभियंता यांनी ते बांधकाम होवू दिले नाही व चक्क दोन वर्षानंतर आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला तेथील बांधकाम देवून अफरातफर केल्याचा आरोप करीत मोवाडा येथिल माजी सरपंच तथा घाटंजी तालुका सरचिटणीस गिरिधर राठोड यांनी सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यासह बांधकाम मंत्री व विरोधी पक्ष नेत्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.
मंदिराचे बांधकाम असल्याने समाज बांधवांनी लोकवर्गणी करून जोत्यासह काही बांधकाम केले. ही बाब हेरून शाखा अभियंता यांनी जुने बांधकाम असल्याचे भासवून काम थांबविले व कालांतराने तेच बांधकाम आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला बांधकाम देवून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून निकृष्ट बांधकाम करण्यात आले. यात लोकवर्गणीतून केलेल्या बांधकामाचे मुल्यांकन या कामात करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तक्रारीतून राठोड यांनी केले आहे. यात लोकवर्गणीतून केलेल्या बांधकामाचे पैसे परत करणे गरजेचे असताना येथिल शाखा अभियंता यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून गिरिधर राठोड यांनी तक्रार देवून चौकशी ची मागणी करीत दोषी शाखा अभियंता यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Copyright ©