यवतमाळ सामाजिक

बळीराम पाटील महाविद्यालयात एक दिवसीय वेब संगोष्टी संपन्न

बळीराम पाटील महाविद्यालयात एक दिवसीय वेब संगोष्टी संपन्न

बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट येथे हिंदी , संगणक विभाग व महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारत अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिनांक १२/१०/२०२१ रोजी सकाळी ठीक १०वा. एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न झाले.
“कार्यालयीन हिंदी में संगणक का प्रयोग ” या वेबीनार चे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले. याप्रसंगी ते बोलतांना म्हणाले की हिंदी राजभाषा स्वीकृत होऊन 75 वर्षे पूर्ण झाले आहेत. हिंदी आपल्या क्षमता, सामर्थ्य व विज्ञानाच्या बळावर पुढे जात आहे. असे मत व्यक्त केले. ते पुढे बोलतांना म्हणाले की हिंदी जन भाषा ते विश्व भाषा बनत आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात बीकॉमच्या विद्यार्थिनी कु सालेहा व संच ने स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के. बेंबरेकर यांनी केले संगोष्टीचे अतिथी वक्तव्य शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे रुपेश दलाल यांनी केले. बीज भाषक अनुवादक, साहित्यिक, पूर्व सहाय्यक महाप्रबंधक डॉ दामोदर खडसे यांनी केले. ते बोलताना पुढे म्हणाले की राजभाषा रोजगार मुख भाषा आहे. आर्यभट, कामिल बोलके इ. विचारवंताचे उदाहरण दाखले देऊन हिंदी चे महत्व सिद्ध केले.

प्रथम सतराचा अध्यक्षीय समारोप शिक्षण संस्था किनवट चे अध्यक्ष लोकनेते प्रफुल राठोड यांनी केले.ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की या वेबीनार चा निश्चितच फायदा या भागातील आदिवासी बंजारा बहुल समाजातील विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा बाळगतो. अशा चर्चासत्राचे वेळोवेळी आयोजन करण्यात यावे असे मत व्यक्त केले .
एक दिवशी राष्ट्रीय वेब संगोष्टीचा विषय “कार्यालयीन हिंदी मे संगणक का प्रयोग” हा होता यामध्ये विषय विशेषज्ञ म्हणून श्याम सुंदर कथुरिया संयुक्त निर्देशक राजभाषा नई दिल्ली यांनी ” हिंदी भाषा में यूनिकोड का महत्व” या विषयावर मार्गदर्शन केले ते बोलताना म्हणाले की युनिकोडमध्ये टाईप केल्यास विश्वातील कुठल्याही संगणकात ओपन होईल व युनिकोड ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले .
“हिंदी मे रोजगार की संभावना”या विषयावर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रोफेसर अवधेश कुमार यांनी हिंदी मधील नोकरीचे क्षेत्र विस्तृत आहे असे मत व्यक्त केले. अनुवाद, पटकथा लेखन, जाहिरात लेखन, राजभाषा अधिकारी, भाषण कौशल्य, यासारख्या नोकरीच्या संधी आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले की ‘हिंदी मे है दम मोके नही हैं कम” आसे मत व्यक्त केले.या वेबिनार ला विशेष अतिथी म्हणून हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव हे उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात हिंदी विभाग प्रमुख कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील प्रोफेसर डॉ. सुनील कुलकर्णी यांनी केले. हिंदी चा प्रचार प्रसार एवढा झाला पाहिजे की “हर घर हिंदी घर घर हिंदी” असा नारा दिला व संपूर्ण वेबिनार चा लेखाजोखा घेतला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय हिंदी विभाग अध्यक्ष डाँ. सुनील व्यवहारे सरस्वती महाविद्यालय किनवट, डॉ. रमेश कुरे अभ्यास मंडळ सदस्य तथा हिंदी विभागाध्यक्ष नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडाबाळापुर,डॉ. लता पेंडलवार, कोमल कुमार परदेशी चाळीसगाव, मनीषा महाजन,मनोज पाटील नहाटा,यांनी दिला या वेबिनार साठी तांत्रिक सहाय्यता अक्षरा मल्टीडिसिप्लनरी जर्नल चे संपादक गिरीश कोळी नागरी लिपी नई दिल्ली यांनी केले. या वेबिनारचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जी.बी. लांब राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार डॉ. आनंद भालेराव, राजकुमार नेम्मानीवार,डॉ. श्रीनिवास रेड्डी, प्रा. के.वी. मिरासे, पंजाब शेरे, डॉ. शुभांगी दिवे, डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर,कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र धात्रक, दीपक कंधारे,इ. परिश्रम घेतले.या वेबिनार ला सातशे नोंदणी झाली आहे. बहुसंख्यांनी आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख प्रा. शेषराव माने व डॉ. जी. एस. वानखेडे यांनी मानले तर आभार योगेश सोमवंशी यांनी मानले.

Copyright ©