यवतमाळ सामाजिक

बेलोरा येथे लसीकरण शिबीर संपन्न

बेलोरा येथे लसीकरण शिबीर संपन्न

स्थानिक विश्वास नगर येथील आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळ व आरोग्य विभाग बेलोरा च्या संयुक्त विद्यमाने लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते, प्रलय टिप्रमवार ह्यांच्या पुढाकाराने राष्ट्रहित जोपासत व परिसरातील नागरिकांना ह्या लसीकरणाचा लाभ घेता यावा म्हणून हे आयोजन करण्यात आले होते,ह्या लसीकरण शिबिराच्या उदघाटन सोहळ्याकरिता उपविभागीय अधिकारी बक्षी,तहसीलदार कुणाल झालटे,नगर परिषद आरोग्य विभागाचे डॉ विजय अग्रवाल,प्रा डॉ नितीन खर्चे, बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ उईके , खराटे,व कर्मचारी उपस्थित होते, उपस्थित पाहुण्याचे स्वागत,मंडळाचे कोषाध्यक्ष गजानन भोयर,मंगेश बन,आशिष झोपाटे, मंगेश खर्चे, शेखर पोदूतवार, अभिजित यादव ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले,प्रास्ताविकात 21 वे वर्ष साजरे करीत असलेल्या आदिशक्ती दुरगोत्सव मंडळाने आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले त्यात अनेक प्रकारचे शिबिरे,जसे,चालक परवाना शिबीर,दंत चिकित्सा शिबीर,नेत्र तपासणी शिबीर,आरोग्य तपासणी शिबीर,रक्तदान व रक्तगट चाचणी शिबीर,अनेक मान्यवरांचे व्याख्याने,स्व शंकर बढे,मिर्झा बेग,जयंत चावरे,रमेश ठाकरे ह्यांचे समाज प्रबोधन पर कार्यक्रम,लहान मुलांसाठी अनेक मैदानी खेळ व महिला पुरुषांसाठी भरपूर स्पर्धांचे आयोजन गतकाळात मंडळाने केले असे प्रस्ताविकातून प्रलय टिप्रमवार ह्यांनी सांगितले,आभार प्रदर्शन सौ अंजली फेंडर ह्यांनी केले,कार्यक्रमासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,ह्या लसीकरण शिबिरात 210 लाभार्थ्यांनी आपले लसीकरण करून घेतल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली

Copyright ©