यवतमाळ सामाजिक

वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईने सर्वसामान्य त्रस्त पोलिसांची कारवाई थांबविण्याची मागणी

वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईने सर्वसामान्य त्रस्त
पोलिसांची कारवाई थांबविण्याची मागणी

यवतमाळ ते दारव्हा हा मार्ग अत्यंत अरुंद व वर्दळीचा आहे या मार्गाने शहरात कामाकरीता मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात ये- जा करतात त्यातच वाहतूक पोलिसांच्या कारवाईने मजूर वर्ग व सर्वसामान्य हतबल झाले आहे
प्रथमच रस्ता रुंदीकरण करावे व वाहतूक पोलिसांना नियमित ठिकाण द्यावे जने करून भविष्यात मोठी दुर्घटना घडणार नाही अन्यथा या मुळे अनेक वेळा रस्ता बंद झाल्याचे चित्र दिसून येते या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारी यांना
आज १२ ऑक्टोंबर २०२१ ला देण्यात आले यवतमाळ दारव्हा रोड वरील उमर्डा नर्सरी येथे (वाहतुक पोलिस कर्मचारी)ट्रॅफिक पोलिसान मुळे यांच्यामुळे सर्वसामान्य जनतेला होणारा नाहक त्रास व आर्थिक लूट थांबविण्यात यावी अशा इतर मागणीचे
निवेदन देताना जीत एस.पवार,जिल्हा-उपाध्यक्ष,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, यवतमाळ, जिल्हा, मयुर राठोड, तालुका संघटक, आशिष राठोड, नितेश राठोड,चंदन राठोड, कुणाल जवादे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…
जिल्हाधिकारी यानी आश्वासन दिले की होणारा त्रास थांबविण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना सुचना देण्यात येईल त्या मुळे समाधान वेक्तं केले आहे

Copyright ©