यवतमाळ राजकीय सामाजिक

शहरातील बायपासवर महा विकास आघाडीच्या वतीने लखीमपूर घटनेचा निषेध

जिल्हा प्रतिनिधी

शहरातील बायपासवर महा विकास आघाडीच्या वतीने लखीमपूर घटनेचा निषेध

शहरातील यवतमाळ नागपूर बायपास वर महा विकास आघाडीच्या वतीने वर्षाताई निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ चक्काजाम करण्यात आला होता यावेळी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता यवतमाळ नागपूर हायवे वरील उड्डाणपुलाजवळ पक्षातील सर्वच महा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन दुपारी बारा वाजता यादरम्यान चक्काजाम करण्यात आला होता यावेळी माजी आमदार वसंतराव पुरके यांनी तीव्र शब्दात लखीमपूर घटनेचा निषेध करत केंद्र सरकारचा व उत्तर प्रदेश सरकारचा निषेध व्यक्त केला तसेच राष्ट्रवादीच्या वर्षा निकम यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली शिवसेनेचे राजू मांडवकर तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे दिलीप डवरे यांनी लखीमपूर येथील झालेल्या घटनेत शेतकऱ्यावर केलेला हल्ला हा निंदनीय असल्याचे मत व्यक्त केले यावेळी कळंब पंचायत समितीच्या सभापती उपसभापती राठोड तसेच गजानन पंचबुद्धे बाळासाहेब दरने सोनू सीदीकी रोशन गोरे अमोल मेश्राम बंडू वाघाडे निलेश राठोड सचीन माइदे सह अन्य महा विकास आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Copyright ©