महाराष्ट्र सामाजिक

लोकप्रतीनिधींनो (निधा) टाकळी रस्त्याने या रोख बक्षीसासह सत्कार करून घ्या

हिंगणघाट प्रतिनिधी सचिन महाजन

लोकप्रतीनिधींनो (निधा) टाकळी रस्त्याने या रोख बक्षीसासह सत्कार करून घ्या 

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास चे आवाहन
————————————-
मुख्य मार्गाला आले शिवपांधन स्वरूप
————————————–

पंधरा वर्षा पूर्वी करण्यात आली होती रसत्याची निर्मिती

निधा टाकळी हे गांव हिंगणघाट तालुक्यात येत असले तरी या परिसरातील बरेच गांव देवळी विधानसभा मतदार संघाला जोडल्या गेले आहे, परंतु गेल्या पंधरा वर्षापासून या परिसरातील रस्त्यांकड़े लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने, (निधा) टाकळी श्री क्षेत्र थाटेश्वर व संत भोजाजी मजाराजांची पावन भूमी असलेल्या शिरसगाव आजनसरा या मार्गाची अवस्था अत्यंत भयावह झाली असल्याने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास चे वर्धा जिल्हा संघटक भास्करराव कोसुरकर यांनी शिरसगाव निधा टाकळी या रस्त्याने आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्यांसह इतर लोकप्रतिनिधींनी कोणत्याही वाहनाने प्रवास करून थाटेश्वर देवस्थान येथे येऊन दाखविल्यास एक हजार रुपयांचे रोख बक्षीस व जंगी सत्कार करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे संगीले आहे.
(निधा) टाकळी सिरसगाव हा मार्ग भोजाजी महाराजांच्या आजनसरा या संत नगरीला,व वर्धा यशोदा नदीच्या संगम तीरावर वसलेल्या थाटेश्वर येथे असलेल्या हेमाडपंथी महादेवाच्या
मंदिराला जोड़नार मुख्य मार्ग असल्याने, दोन्ही तीर्थक्षेत्रस्थळी यवतमाळ अमरावती जिल्हासह पश्चिम विदर्भातुंन येणाऱ्या भविकांची संख्या मोठी असते रविवार आणि बुधवार ला ईथे येणाऱ्या
भविकांच्या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत असतात, परंतु लोकप्रतिनिधींनी या मार्गाकडे सपशेल दुर्लक्ष केले असल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत भयावह
झाली असून मार्गावरील गिट्टी डांबर उखडून रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले असल्याने शिवपांधन पेक्षा ही भयावह चित्र निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पाण्याचे तलाव निर्माण झाले आहे,त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची दयनीय अवस्था पासून स्वातंत्र्याची व्याख्या नक्कीच बदलून जाते, टाकळी इथे सातव्या वर्गापर्यंत शाळा असून विध्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वडनेर हिंगणघाट या ठिकाणी जावे लागते परंतु या गावाचा रस्ताच नामशेष झाला असल्याने स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही अनेक विध्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले, ही लोकप्रतिनिधींसाठी अत्यन्त लाजीरवाणी गोष्ट आहे, 15 वर्षा पूर्वी या स्त्याच्या निर्मितीसाठी टाकळी निधा येथिल गावकर्यांनी जनांदोलन उभारले होते त्यानंतर या रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती,त्यानंतर अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या अनेक लोकप्रतिनिधींनी रस्ता निर्मिती करणार असल्याचे वादे केले, परंतु परिस्थिती जैसे थे असल्यामुळे ‘क्या हुवा तेरा वादा’ असा प्रश्न गावकरी लोकप्रतिनिधींना विचारत आहेत,
त्या मुळे जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास चे वर्धा जिल्हा संघटक भास्करराव कोसुरकर यांनी हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन रस्ता निर्मितीची मागणी केली आहे, व या रस्त्याने प्रवास करून दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधीना एक हजाराचे बक्षीस देऊन सत्कार करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे, तसेच लवकरच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन जनआंदोलन उभारणार असल्याचे संगीतले त्यामुळे कोणता नेता या रस्त्याने प्रवास करून बक्षीस व सत्कार मिळवतो या कडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Copyright ©