यवतमाळ सामाजिक

जग कोरोना मुक्त होऊ दे,बळीराजा सुखी होऊ दे, नाना पटोले यांचे रेणुकामातेला साकडे.

माहूर प्रतिनिधी पद्मा गिऱ्हे

जग कोरोना मुक्त होऊ दे,बळीराजा सुखी होऊ दे, नाना पटोले यांचे रेणुकामातेला साकडे.

कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी दि.12 ऑक्टो.रोजी स.10 वा. श्री रेणुकामाता मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेवून जग कोरोना मुक्त होऊ दे, अन् बळीराजा सुखी होऊ दे असे मातेला साकडे घातले.
मंदिराच्या प्रांगणात शतचंडी पाठास बसलेल्या सर्वच पुजाऱ्यांची नानांनी सपत्नीक पूजा करून दक्षिणा दिली.तद्नंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय काण्णव यांनी नाना पटोले यांचा सपत्नीक सन्मान केला.यावेळी ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे,तालुकाध्यक्ष संजय राठोड,माजी नगराध्यक्ष प्रा.राजेंद्र केशवे,डॉ.निरंजन केशवे,दिलीप मूनगिनवार, किसन राठोड,सचिन बेहेरे, राजकिरण देशमुख आदींची उपस्थिती होती.

Copyright ©